OnePlus 45W liquid cooler : या वर्षीचा सर्वात मोठा मोबाईल शो बार्सिलोनामध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा मोबाईल शो 2 मार्चपर्यंत चालणार आहे. या मोबाईल शोमध्ये विविध मोबाईल फोन उत्पादक कंपन्या त्यांचे नवीन गॅजेट्स, तंत्रज्ञान इत्यादी सर्वांसमोर ठेवत आहेत. चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus ने MWC येथे 145-वॅट लिक्विड कूलर सादर केला आहे. जो मोबाईल फोनला गरम होण्यापासून वाचवेल.
आजकाल बहुतेक फोन आधुनिक तंत्रज्ञानासह येतात. ज्यामध्ये पॉवरफुल प्रोसेसर, ग्राफिक्स इत्यादी अनेक फीचर्स दिले जातात. तसे तर मोबाईल फोन थंड ठेवण्यासाठी त्यात कूलिंग सिस्टीम देण्यात येते. परंतु तरीही सततच्या वापरामुळे अनेक वेळा मोबाईल जास्त गरम होतो. ही समस्या कमी करण्यासाठी OnePlus ने 'OnePlus 45W लिक्विड कूलर' सादर केला आहे.
OnePlus ने मोबाईल शोमध्ये OnePlus 11 कॉन्सेप्ट फोन देखील सादर केला आहे. ज्यामध्ये कंपनीने लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी दिली आहे. कंपनीने आज सादर केलेले गॅझेट कोणत्याही स्मार्टफोनमध्ये वापरला जाऊ शकतो आणि तुमचा मोबाईल कूल ठेवू शकता. OnePlus च्या या लिक्विड कूलरचे वजन 75 ग्रॅम आहे, जे वाहून नेण्यास सोपे आहे. हा कूलर तुमच्या मोबाइल फोनचे तापमान 20 अंशांपर्यंत आणू शकतो. मोबाइल थंड करण्यासाठी तुम्हाला फक्त स्मार्टफोनला डिव्हाइसच्या वर ठेवावे लागेल. याची किंमत किती असेल, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. तसेच सामान्य युजर्ससाठी हा कधी उपलब्ध होईल याबाबतही माहिती समोर आलेली नाही.
OnePlus 11R ची प्री-ऑर्डर सुरू
OnePlus ने 7 फेब्रुवारी रोजी क्लाउड 11 इव्हेंटमध्ये त्यांचा प्रीमियम OnePlus 11 सीरिज अंतर्गत OnePlus 11 आणि OnePlus 11R हे दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले होते. OnePlus 11 ची विक्री 14 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे, परंतु OnePlus 11R ची विक्री सुरू झाली नाही. आता हा फोन लवकरच युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. OnePlus 11R ची 21 फेब्रुवारीपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर प्री-ऑर्डरसाठी बुकिंग सुटू झाली असून याची विक्री आजपासून सुरू झाली आहे.
Redmi सादर केले हे गॅझेट
दरम्यान, Redmi ने मोबाईल शोमध्ये 300W चा फास्ट चार्जर सादर केला आहे. जो फक्त 5 मिनिटात मोबाईल फोन पूर्णपणे चार्ज करू शकतो. यापूर्वी Realme GT 3 स्मार्टफोन जगभरात चर्चेचा विषय बनला होता, ज्यामध्ये कंपनीने 240-वॉटचा चार्जर दिला आहे. आता Redmi चा पॉवरफुल चार्जर आल्यानंतर सगळेच याबद्दल बोलत आहेत. या 300W चार्जरसह फोन फक्त 2 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज होतो.