OnePlus Smartphone : OnePlus या कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात भारतात OnePlus 12 ची सीरिज लॉन्च केली होती. आता अवघ्या 3-4 महिन्यात कंपनीने नवीन स्मार्टफोन (Smartphone) म्हणजेच OnePlus 13 च्या लॉन्चिंगची तयारी सुरु केली आहे. या स्मार्टफोनबाबत काही माहिती लीक झाली आहे. 


OnePlus 13 चे फिचर्स लीक


मिळालेल्या माहितीनुसार, OnePlus 13 चे काही फीचर्स लीक झाले आहेत. OnePlus चे बॅक डिझाईन चेंज करण्यात आलं आहे. तसेच, हा स्मार्टफोन पोस्टनुसर, 13 ऑक्टोबर 2024 रोजी लॉन्च होणार असल्याचं दिसतंय.  






याशिवाय X च्या या पोस्टमध्ये OnePlus 13 चे काही फीचर्स आणि नवीन डिझाईन देखील समोर आले आहे. पोस्टनुसार, OnePlus फोनच्या मागील बाजूस असलेल्या कॅमेरा मॉड्यूलचे डिझाईन बदलणार आहे.


कॅमेरा डिझाईन बदलणार!







पूर्वीच्या OnePlus 12 मध्ये कंपनीने मागच्या बाजूस मोठ्या आकाराचा गोलाकार कॅमेरा (Camera) मॉड्यूल दिला होता. पण, आता OnePlus 13 च्या स्मार्टफोनमध्ये कंपनीने एक व्हर्टिकल आकाराचा कॅमेरा मॉड्युल दिला आहे. OnePlus Club ने शेअर केलेल्या फोटोत असं दिसतं की मागच्या डाव्या बाजूला एक लांब कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्याच्या मध्यभागी मुख्य कॅमेरा सेन्सर आहे आणि त्या ठिकाणी कॅमेरा मॉड्युल देखील थोडेसे बाहेरच्या बाजूने फ्लिप आहे. या फोनच्या कॅमेरा सेटअपच्या शेजारी एक व्हर्टिकल डिझाईन केलेला एलईडी फ्लॅश लाईट दिसतोय.  


याशिवाय, फोनच्या डाव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर्स आणि पॉवर बटण दिले जाणार असल्याचे दिलेल्या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. या व्यतिरिक्त वनप्लस क्लबने (OnePlus Club) आज एक नवीन पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की वनप्लस 13 पाणी आणि धूळपासून संरक्षण करण्यासाठी IP68 रेटिंगने सुसज्ज असेल. तसेच, येत्या काही आठवड्यांत फोनच्या संदर्भात आणखी माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


Whatsapp : व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार