OnePlus Event : OnePlus नं भारतात आज मेगाइव्हेंट आयोजित केला आहे. आजच्या इव्हेंटमध्ये कंपनी दोन स्मार्टफोन आणि  TWS लॉन्च करणार आहे. OnePlus 12 काही दिवसांपूर्वी चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. आता वनप्लस हा स्मार्टफोन भारतात आणि ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. लॉन्च होण्यापूर्वी फोनची किंमत आणि फिचर्स समोर आले आहेत.


OnePlus 12 च्या किंमती Amazon वर लीक झाल्याचा दावा टिपस्टर इशान अग्रवालनं ट्विटरवर दावा केला होता. Amazon वर किंमतीचे तपशील होते, जे नंतर हटवण्यात आल्याचंही त्यानं सांगितलं. पण त्याचे स्क्रीनशॉट इंटरनेटवर फिरत आहेत.


OnePlus 12 ची संभाव्य किंमत


OnePlus 12 (12GB Ram + 256GB Storage) ची किंमत 69,999 रुपये असू शकते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, चीनमध्ये लॉन्च झालेल्या या व्हर्जनची किंमत कमी होती. OnePlus Buds 3 देखील यासोबत लॉन्च केला जाईल.


OnePlus 12R ची संभाव्य किंमत 


OnePlus 12R ही लाईट व्हर्जन असेल. त्याची किंमत OnePlus 11R सारखीच असू शकते. या हँडसेटची किंमत 40 हजार रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंत असू शकते. अहवालानुसार, US मध्ये OnePlus 12R (8GB RAM + 128GB Storage) ची किंमत 499 यूएस डॉलर असू शकते, तर 16GB RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेज वेरिएंटची किंमत 599 यूएस डॉलर असेल. जर भारतातील किमतीबाबत बोलायचं झालं, तर सुरुवातीची किंमत 41,500 रुपये असेल आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 49,800 रुपये असण्याचा अंदाज आहे. 


OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन्स


OnePlus 12 चीनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेटसह लॉन्च करण्यात आला होता. भारतातही नवाकोरा स्मार्टफोन याच प्रोसेसरसह लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. या प्रोसेसरच्या मदतीनं अनेक एआय फीचर्स पाहायला मिळतील. हा फोन 16GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेजसह उपलब्ध असेल. OnePlus 12 मध्ये 6.82-इंचाचा डिस्प्ले आहे, ज्यासोबत 2K रिझोल्यूशन डिस्प्ले उपलब्ध असेल. तसेच, 120Hz चा रिफ्रेश दरही मिळेल. या डिस्प्लेमध्ये LTPO AMOLED पॅनल तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. त्याची कमाल चमक 4,500 nits असेल.


OnePlus 12 चा कॅमेरा सेटअप


OnePlus 12 मध्ये Hasselblad-tuned कॅमेरा सिस्टम असेल, जो ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 48-मेगापिक्सेल वाइड अँगल लेन्स आहे. दुसरी 48-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. 64-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आहे, जो 3x टेलिफोटोसह येतो. यात 32MP सेल्फी कॅमेरा आहे.