OnePlus 11 5G vs OnePlus 11R: वनप्लस 7 फेब्रुवारीला अनेक गॅजेट्स बाजारात आणणार आहे. कंपनी या दिवशी OnePlus 11 5G आणि OnePlus 11R स्मार्टफोन लॉन्च करेल. यातच आज जाणून घेऊ की या दोन्ही फोनपैकी कोणता मोबाईल तुमच्यासाठी चांगला असू शकतो.
OnePlus 11R 5G
OnePlus 11R 5G बद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला यामध्ये 6.7 इंच FHD Plus वक्र AMOLED डिस्प्ले मिळेल. जो 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा मोबाईल फोन कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जनरेशन 1 प्रोसेसरवर काम करेल आणि 16 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. या स्मार्ट फोनमध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 12-मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. OnePlus 11R ची किंमत सुमारे 45,000 रुपये असू शकते. हा मोबाईल अजून लॉन्च झालेला नाही, त्यामुळे याची नेमकी माहिती अजून समोर आलेली नाही.
OnePlus 11 5G
OnePlus 11 5G बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात 6.7-इंचाचा QHD Plus AMOLED डिस्प्ले मिळेल. जो 120 hz च्या रीफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा मोबाईल फोन स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन टू प्रोसेसरवर काम करेल. यामध्ये तुम्हाला 16 GB रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेजचा पर्याय मिळेल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50-मेगापिक्सल कॅमेरा, 40-मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि 32-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा असेल, तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सलचा कॅमेरा फ्रंटमध्ये उपलब्ध असेल.
OnePlus 11 5G मध्ये, तुम्हाला 5000 mAh बॅटरी मिळेल जी 100 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनची किंमत जवळपास 55,000 रुपये असू शकते. स्टोरेजनुसार किंमत कमी-अधिक असू शकते. मोबाईल फोन लॉन्च झाल्यानंतरच नेमकी माहिती समोर येईल.
कोणता फोन आहे बेस्ट?
तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन चांगला असू शकतो याबद्दल बोलायचं झालं तर तो OnePlus 11 5G असेल. कारण स्मार्टफोनमध्ये तुम्हाला चांगला कॅमेरा, चांगला प्रोसेसर आणि चांगल्या स्टोरीजचा पर्याय मिळतो. तर OnePlus 11R मध्ये तुम्हाला या फोनपेक्षा काही फीचर्स कमी मिळतात. मग ते कॅमेऱ्याच्या बाबतीत असो वा प्रोसेसरच्या स्वरूपात. जर किंमतीच्या बाबतीत पाहिले तर, OnePlus 11 5G नक्कीच महाग आहे, परंतु यामध्ये तुम्हाला त्यानुसार फीचर्स दिले जात आहेत. फोटोग्राफीच्या दृष्टीने OnePlus 11 5G हा एक चांगला पर्याय आहे. जर बजेट तुमची समस्या नसेल तर OnePlus 11 5G तुमच्यासाठी एक चांगला स्मार्टफोन आहे.