DogeRAT Malware:  DogerAT (रिमोट ऍक्सेस ट्रोजन) या नव्या व्हायरसचा शोध संशोधकांनी लावला असून बनावट अॅप्सच्या माध्यमातून हा व्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये शिरकाव करु शकतो असं सांगण्यात येत आहे. टेलिग्राम आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यामांवर तुम्हाला या व्हारयसची लिंक पाठवली जाऊ शकते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अनोळखी मेसेजला प्रतिसाद न देण्याचे आवाहन आता नागरिकांना करण्यात येत आहे. 


 CloudSEKने दिलेल्या माहितीनुसार, DogerAT हा एक व्हायरस असून त्याद्वारे तुमच्या बँकेच्या खात्याची माहिती, तुमचे सरकारी ओळखपत्र आणि इतर महत्त्वाची माहिती आणि कागदपत्र चोरी केले जाऊ शकतात. तसेच या व्हायरसचे शिकार कोणत्याही वर्गातील लोक होऊ शकतात. परंतु बँकिंग, व्यवसाय आणि मनोरंजन क्षेत्रातील लोकांना या गोष्टीचा सर्वाधिक धोका आहे. 


DogerAT हा व्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये एका अॅपद्वारे शिरकाव करु शकतो. एकदा का या व्हायरसने तुमच्या फोनमध्ये शिरकाव केला तर तुमच्या मोबाईलमधील महत्त्वाची माहिती चोरीला जाईलच पण हॅकर्सना तुमच्या मोबाईलचा पूर्णपणे अॅक्सेस मिळू शकतो. त्यानंतर हॅकर्स तुमच्या फोनमधील महत्त्वाची माहिती, तुमचे कॉल रेकॉर्ड्स, तसेच तुमचे फोटो देखील सहज मिळवू शकता. 


 CloudSEKने पुढे माहिती देताना म्हटले की, DogerATची अनेक हॅकर्सकडून विक्री केली जात आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून हॅकर्स या व्हायरसची विक्री करत असून ते या व्हायरसचे प्रिमियम व्हर्जन विकत आहेत. त्यामुळे तुमच्या मोबाईलमधले फोटो चोरणे तसेच महत्त्वपूर्ण माहिती मिळवणे सहज शक्य होऊ शकते. तसेच याबाबतील हॅकर्स हे त्यांचा फायदा बघत असून कोणत्याही प्रकारचा खर्च ते या गोष्टीसाठी करत नाही आहेत असं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे याची किंमत देखील कमी असून फसवणूकीचे प्रकार घडवून आणण्यासाठी उत्तेजन देत असल्याचं म्हटलं जात आहे. 


अशा गोष्टींपासून सुरक्षित कसे राहायचे?


कोणत्याही प्रकारच्या अनोळखी मेसेजला प्रतिक्रिया देताना त्या नंबरची व्यवस्थित पडताळणी करुन घ्यावी. अनोळखी नंबरवरुन कोणत्याही प्रकारची लिंक आल्यास ती सुरु करताना योग्य काळजी घ्यावी. तसेच शक्यतो या लिंक सुरु करणे टाळावे जेणेकरुन भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. तसेच तुमच्या मोबाइलमधील सॉफ्टवेअर कायम अपडेट ठेवावे जेणेकरुन तुमच्या मोबाइलमध्ये सुरक्षेसाठीचे योग्य ते फिचर उपलब्ध राहण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे यासंदर्भातली योग्य माहिती कायम वाचा जेणेकरुन अशा प्रकारच्या फसवणूकीपासून तुमचा बचाव होण्यास मदत होईल.