Gmail Safe Listing : आजकाल कोणतेही काम करताना ई-मेलचा वापर केला जातो. प्रत्येक प्रायव्हेट क्षेत्रात मेलशिवाय कोणतेच काम होत नाही. अनेक संवाद हे मेलवरच चालू असतात. अशा वेळेस कित्येकदा आपल्याला महत्वाचे मेल मेल बाॅक्समध्ये दिसत नाहीत. त्यामुळे कामे वेळेवर होऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत काय करावे हे जाणून घेऊयात.
Gmail मध्ये यूजर्सकरता Safe Listing नावाचे फिचर देण्यात आले आहे. ज्याला White Listing असे देखील म्हणले जाते. या फिचरच्या मदतीने तुमचे महत्वाचे मेल तुम्हाला वेळेत आणि न चुकता मिळतात. हे फिचर वापरण्याकरता तुम्हाला Gmail काही Email Address आणि Domain जोडण्याची परवानगी देते. ज्यामुळे तुमचे महत्वाचे मेल स्पॅममध्ये न जाता Mail Inbox मध्ये येतात.
Safe Listing फिचर कसे वापरावे?
- सर्व प्रथम Gmail ओपन करा आणि सेटिंग्जवर जा.
- यानंतर All Settings मध्ये जावा आणि Filter पर्यायावर क्लिक करा.
- आता Create New Filter पर्याय निवडा आणि नवीन फिल्टर तयार करा.
- येथे विचारलेली सर्व माहिती भरा आणि Create Filter वर क्लिक करा.
- तुम्हाला आता एक पॉप-अप दिसेल ज्यात Never send this to spam या पर्यायावर क्लिक करा.
- हे केल्यास तुमचे महत्वाचे मेल Inbox मध्ये येतील.
आता तुम्ही मोबाईलवरही तुमच्या आवडत्या भाषेत मेलचे भाषांतर करू शकता
Google ने आपल्या Gmail अॅपसाठी एक नवीन फिचर आणलं आहे. या फिचरच्या माध्यमातून युजर्सना ई-मेलचं भाषांतर करता येणार आहे. नवीन फीचरच्या मदतीने युजर्स आपल्याला हव्या असलेल्या भाषेत ई-मेलचे भाषांतर करू शकणार आहेत.
Gmail भाषांतर फिचर कसे वापराल?
- मेसेजचे भाषांतर करण्यासाठी, तुमच्या ईमेलच्या टॉपवर "अनुवाद करा" पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला मूळ भाषेत ईमेल वाचायचा असल्यास तुम्ही भाषांतर पर्याय डिसमिस देखील करू शकता.
- जेव्हा Gmail ला निर्दिष्ट केलेल्या भाषेपेक्षा भिन्न ईमेलचा मजकूर आढळतो तेव्हा हे बॅनर पुन्हा दिसेल.
- एखाद्या विशिष्ट भाषेसाठी भाषांतर बॅनर बंद करण्यासाठी, तुम्हाला "पुन्हा भाषेचे भाषांतर करू नका" वर टॅप करणे आवश्यक आहे.
- सिस्टीम इतर कोणतीही भाषा शोधू शकत नसल्यास, तुम्ही (i) बटण (तीन ठिपके) वर टॅप करून स्वत: भाषांतर करू शकता.
इतर महत्वाच्या बातम्या
Apple Smartawatch : Apple Watch Series 9 आणि Ultra 2 मध्ये मिळणार भन्नाट फिचर्स , जाणून घ्या सविस्तर