मुंबई : मायक्रोसॉफ्टने (Microsoft) 1995 पासून त्यांच्या प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीममध्ये वर्डपॅड ऍप्लिकेशन प्रदान करण्यास सुरुवात केली. सध्या हे Windows 11 मध्ये देखील आहे. दरम्यान, आता कंपनी विंडोज 11 च्या नवीन बिल्डमध्ये ते काढून टाकणार आहे. तसेच, ते आता पुन्हा घेतले देखील जाऊ शकत नाही. पण कंपनी असं का करत आहे, हा प्रश्न तुम्हाला पडला असले. याचं कारण म्हणजे आता फार कमी लोक वर्डपॅड वापरतात. पण त्याजागी कंपनीने त्याऐवजी 2 सर्वोत्तम पर्याय आधीच युजर्सना दिले आहेत.
वर्डपॅडऐवजी हे 2 अॅप वापरा
या अपडेटची पहिली माहिती Windows Insider च्या Windows 11 Canary Channel बिल्डमध्ये देण्यात आली होती. ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, नवीन बिल्ड ओएस क्लिन इनस्टॉल केल्यानंतर वर्डपॅड आणि पीपल अॅप्स इनस्टॉल करता येणार नाही. तसेच भविष्यात, वर्डपॅड अपग्रेडमधून काढून टाकले जाईल. याशिवाय, ते पुन्हा इनस्टॉल करणे शक्य होणार नाही.
वर्डपॅड युजर्साठी चांगली बातमी अशी आहे की, कंपनीने अद्याप स्टेबल विंडोज 11 व्हर्जनमधून ते काढून टाकलेले नाही. तुम्ही अजूनही ते वापरू शकता. सध्या, बीटा आवृत्तीमध्ये बदल केले गेले आहेत जे नंतर स्टेबल व्हर्जनमध्ये देखील येऊ शकते. तुम्ही वर्डपॅड अॅप वापरत असल्यास, आता त्याऐवजी तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा नोटपॅड अॅप वापरावे.मजकूर दस्तऐवजांसाठी तुम्ही Notepad वापरू शकता तर .doc फाइल्ससाठी तुम्ही Microsoft Word वापरू शकता. तुम्हाला दोन्ही अॅप्समध्ये नवीन वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत ज्यामुळे तुम्हाला काम करणे सोपे होईल.
कीबोर्डच्या बटणांमध्ये देखील होणार बदल
मायक्रोसॉफ्ट विंडोज कीबोर्डवरील कोपायलट एआय सर्च इंजिन बटणासह विंडोज बटण बदलणार आहे. सध्या, काही Windows 11 लॅपटॉपसह सुरू केले गेले आहे जे हळूहळू सर्वांवर लागू केले जाईल. नवीन अपडेटनंतर, तुम्हाला लॅपटॉप कीबोर्डच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला एक नवीन बटण दिसेल आणि विंडोज बटण काढून टाकले जाईल.
मायक्रोसॉफ्टने (Microsoft) आगामी काळात Windows 10 ऑपरेटिंग सिस्टमसाठी सुरक्षा आणि बग्ससह इतर सिस्टीमचा सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ या OS वर कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा सपोर्ट दिला जाणार नाही. याचा मोठा परिणाम कंपनीवर होणार असल्याचं देखील म्हटलं जातं आहे.