Threads App Launched : सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर ट्विटरशी (Twitter) स्पर्धा करण्यासाठी मेटाने (Meta) 'थ्रेड्स' (Threads App) हे नवीन अॅप लॉन्च केले आहे. हे नवीन अॅप ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीच्या ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला थेट आव्हान दिलं आहे. या अॅपमध्ये Twitter सारखेच सर्व फीचर्स देण्यात आले आहेत. अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीवर देखील तुम्ही हे अॅप डाऊनलोड करू शकता.


यूएस, यूके, ऑस्ट्रेलिया आणि जपानसह 100 हून अधिक देशांमध्ये उपलब्ध


'थ्रेड्स' (Threads App) ही मेटाच्या फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्रामची 'टेक्स्ट' शेअरिंग व्हर्जन आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अॅप 'नवीन अपडेटेड माहिती आणि सार्वजनिक संभाषणासाठी एक नवीन व्यासपीठ' उपलब्ध करून देणार आहे. हे अॅप अमेरिक, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि जपानसह 100 हून अधिक देशांमध्ये Apple आणि Google च्या Android अॅप स्टोअरवर उपलब्ध झालं आहे. 


पॉप स्टार शकीरासह अनेक मोठ्या व्यक्तींनी थ्रेड्सवर उघडलं अकाऊंट


अॅप उपलब्ध होताच, शेफ गॉर्डन रामसे, पॉप स्टार शकीरा आणि मार्क हॉयल यांसारख्या सेलिब्रिटींनी त्यावर आपलं अकाऊंट ओपन केलं आहे. यावर 'Like', 'Repost', 'Reply' आणि 'Coat' कोणताही 'थ्रेड' (म्हणजे पोस्ट) करण्याचा पर्याय आहे. हे सर्व पर्याय ट्विटरवरही उपलब्ध आहेत.


थ्रेड्सवरील शब्दमर्यादा Twitter पेक्षाही जास्त 


कंपनीने म्हटले आहे की, 'आम्ही 'थ्रेड्स' द्वारे एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जे 'टेक्स्ट' (Text) आणि संवादांवर अधिक लक्ष केंद्रित करणारं आहे. ज्याप्रमाणे  इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.' या नवीन अॅपमध्ये 'पोस्ट'साठी अक्षर मर्यादा 500 निश्चित करण्यात आली आहे, तर ट्विटरवर ती मर्यादा 280 आहे. यामध्ये पाच मिनिटांपर्यंतच्या लिंक्स, फोटो आणि व्हिडीओ तुम्हाला शेअर करता येतील.


थ्रेड्स फॉलो करणार Instagram च्या कम्युनिटी गाईडलाईन्स


मेटाने आपल्या यूजर्सना सुरक्षित प्लॅटफॉर्म देण्यासाठी उपाययोजनांवर भर दिला आहे. यामध्ये इन्स्टाग्रामची कम्युनिटी गाईडलाईन्स लागू करण्यात आली आहे. यूजर्स त्यांच्या 'थ्रेड्स'ला कोण उत्तर देऊ शकतात हे नियंत्रित करू शकतात. मात्र, मेटाच्या या नव्या अॅपबाबत सुरक्षेशी संबंधित प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


महत्त्वाच्या बातम्या : 


Threads App Launched : Meta ने लॉन्च केले Threads App; डाऊनलोड करण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा