Meta’s Twitter Competitor App : सध्या सोशल मीडिया कंपन्यांकडून युजर्सना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काही भन्नाट अॅप लाँच केले जात आहेत. सोशल मीडिया कंपन्यांतील एक आघाडीची कंपनी मेटाकडून (Meta) पुढील महिन्यात ट्विटरसारखं अॅप लाँच करण्याच येणार आहे. हे अॅप कधी येणार याबाबत मार्चपासून सोशल मीडियावर खूप चर्चा केली जात होती. त्यामुळे लोकांना या अॅपची प्रचंड उत्सुकता लागली आहे. आता या अॅपविषयी अनेक लोकांनी माहिती शेअर केली आहे. मेटाच्या अॅपबद्दल एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने सांगितले की, पुढील महिन्यात मेटाकडून Twitter सारखं अॅप सुरु केलं जाऊ शकतं. तसेच या अॅपच्या वैशिष्ट्याबद्दलही माहिती शेअर करण्यात आली आहे. हे अॅप ट्विटरसारखं आहे आणि यावरुन लोकांना ट्विटरसारखंचं पोस्टिंग करता येणार आहे. यासोबत पोस्टवर प्रतिसाद आणि प्रतिक्रिया देऊ शकणार आहात. या अॅप बद्दल सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या आणि ट्विटरच्या सध्याच्या पॉलिसीमुळे वैतागलेल्या युजर्सना चांगलीच उत्सुकता लागली आहे.  पण  हे अॅप सध्या प्राथमिक स्तरावर असून  त्याची मेटाकडून चाचणी केली जात आहे. त्यामुळे हे सध्या हे अॅप काही मोजक्या यूजर्ससाठी उपलब्ध आहे. पण लवकरच मेटाकडून हे अॅप सगळ्यांसाठी सार्वजनिक केलं जाणार आहे. 


हे अॅप लाँच करण्यामागील Meta चा उद्देश काय आहे?


मेटाकडून लाँच करण्यात येत असलेल्या अॅपल अद्याप नाव देण्यात आलेलं नाही. याबद्दल मेटाकडून अधिकृतपणे काहीच सांगण्यात आलेलं नाही. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन युजर्सना 500 शब्दांपर्यंत पोस्ट करता येणार आहे. यासोबत व्हिडीओ, छायचित्र आणि पोस्टसोबत लिंकसुद्धा जोडता येणार आहे. पण सध्या हे अॅप प्राथमिक स्तरावर असून अॅपची चाचणी घेतली जात आहे. त्यामुळे काही मोजक्या युजर्सना हे अॅप वापरण्यासाठी उपलब्ध आहे. परंतु. मेटाकडून लवकरच लोकांसाठी हे अॅप उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अगदी, ट्विटरसारखंच या अॅपवरुन युजर्सना पोस्ट लाईक, रिट्विट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. युजर्सन अॅपमध्ये लॉगिन करण्यासाठी इन्स्टाग्राम लॉगिनचाच वापर करावा लागणार आहे. ट्विटरच्या पॉलिसीला वैतागलेल्या युजर्सना मेटाच्या या सोशल मीडिया अॅपची चांगलीच उत्सुकता लागली आहे. 


सोशल मीडिया कंसल्टंट Matt Navarra यांच्या माहितीनुसार, मेटाकडून हे अॅप सार्वजनिक करण्याआधी काही मोठ्या स्टार्सना, प्रसिद्ध व्यक्तींना या अॅपशी जोडून घेतलं जात आहे. याचं कारण अॅपची लाँचिग योग्य पद्धतीने होईल.