Best Marathi Websites : कवी वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी त्यांच्या प्रतिभावान आणि समाजनिष्ठ भावस्पर्शी लेखणीने जागतिक दर्जाचे लेखन केलं आणि मराठी भाषेला साहित्यात विशेष स्थान मिळवून दिलं. मायबोलीचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रज यांना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो.


सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेतील साहित्य ऑनलाईनही उपलब्ध आहे. आज मराठी गौरव दिनानिमित्त (Marathi Bhasha Gaurav Din) आम्ही तुमच्यासाठी मराठीतील टॉप वेबसाईटबाबतची माहिती घेऊन आलो आहोत. 


Top 5 Marathi Websites : मराठीतील टॉप 5 वेबसाईट्स


मराठी विश्वकोश (Marathi Vishwakosh)


मराठी विश्वकोश हा मराठी भाषेतील एक ऑनलाईन मुक्त विश्वकोश आहे. या वेबसाईटसाठी महाराष्ट्र सरकारकडून निधी पुरवला जातो. मराठी विश्वकोश तयार करण्याचा प्रकल्पाची सुरुवात 1960 मध्ये झाली. लक्ष्मणशास्त्री जोशी हे या प्रकल्पाचे पहिले अध्यक्ष होते.


मराठी माती (Marathi Mati)


मराठी माती ही खऱ्या अर्थाने मराठी संस्कृतीचं वर्णन करणारी वेबसाईट आहे. कोणत्याही मराठी माणसाला त्याच्या दैनंदिन दिनचर्येत आवश्यक असलेल्या प्रत्येक पैलूंचा हा संग्रह या वेबसाईटवर उपलब्ध आहे. यामध्ये ज्योतिषशास्त्र, प्राचीन कथा, संस्कार आणि विधी यांची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. 


आठवणीतील गाणी (Aathavanitli Gani)


'आठवणीतली गाणी' ही मराठी गाण्यांची आतापर्यंतची सर्वात व्यापक वेबसाईट आहे. या वेबसाईटच्या होमपेजवर तुम्हाला वर्णमालेतील अक्षरांनुसार मराठी गाण्यांची क्रमवार यादी उपल्बध आहे. प्रत्येक अक्षराच्या अनेक गाण्यांच्या समावेश या वेबसाईटवरील यादीमध्ये आहे. या वेबसाईटवरील गाणी ही इतिहासातील प्रसिद्ध मराठी कलाकारांची उत्कृष्ट रचना आहे. तसेच, गाण्याच्या रचनेबाबतची माहिती, त्याचे बोल, ऑडिओ आणि व्हिडीओ लिंक्ससह अतिशय सहजरित्या तुम्हाला उपलब्ध आहेत. वेबसाईटवर तुम्ही गाणी चित्रपट, नाटक, संगीतकार, गीतकार यानुसारही तुमचं आवडतं गाणं शोधू शकता.


मैत्रिण (Maitrin)


मैत्रिण शब्दाचा अर्थ ‘महिला सखी’ असा या शब्दाचा आहे. जगभरातील कोणत्याही स्त्रीला ज्याला मराठीची थोडीफारही ओळख आहे, त्या महिलांसाठी ही वेबसाईट माहितीचा खजिना आहे. ही वेबसाईट स्त्रियांच्या दृष्टीकोनावर केंद्रित आहे. या वेबसाईटवरील ब्लॉग हे स्त्रियांच्या त्यांच्या दैनंदिन आयुष्याबाबतच्या अनुभवांवर आधारित आहेत. यामध्ये आरोग्य, पोषण आणि करिअर, मातृत्व आणि महिलांसाठीची इतर माहती उपलब्ध आहे. 


मायबोली (Maayboli)


मायबोली ही 1996 मध्ये सुरु झालेली वेबसाईट आहे. ही वेबसाईट मराठी भाषेत सुरु झालेल्या सर्वात जुन्या ब्लॉगपैकी एक ब्लॉग आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीशी निगडित इतिहासाची माहिती देणं हे वेबसाईटचं मुख्य उद्दिष्ट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला चित्रे, कथा, गझल आणि इतर नियतकालिकांसारख्या सर्व गोष्टी उपलब्ध असून हे मनोरंजनासाठी उत्तम आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Marathi Bhasha Gaurav Din 2023 : मराठी भाषा गौरव दिन, शुभेच्छा देत सांगा मायबोलीचं महत्त्व