Mailtrack for Gmail : कोणत्याही सोशल मीडिया (Gmail) ॲप जसे की व्हाट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक वर तुम्ही जेव्हा मेसेज सेंड करतात तेव्हा येणाऱ्या ब्लू टिक मार्फत किंवा मेसेज खाली दिसणार्या seen शब्द मार्फत तुम्हाला तुमचा मेसेज समोरच्याने वाचला की नाही हे समजते. मात्र ईमेलच्या बाबतीत असे घडताना तुम्हाला दिसून येत नाही. आपण केलेला मेल समोरच्या माणसाने वाचला आहे की नाही याबाबतीत आपण कधी कधी भरपूर टेन्शन घेतो. कधी कधी तो ईमेल त्यांनी वाचला की नाही यावरून सुद्धा आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आज आपण याच अडचणीचे समाधान जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया ती पद्धत नेमकी कोणती आहे आणि नेमके कशा पद्धतीने तुम्हाला समजू शकते की तुम्ही सेंड केलेला मेल समोरच्या माणसाने वाचला आहे की नाही? पाहुयात...
-सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या लॅपटॉप किंवा कम्प्युटर मध्ये गुगल क्रोम मधील राईट साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये दिसणाऱ्या तीन डॉट्स वर क्लिक करा.यानंतर तिथे असणाऱ्या more tools या ऑप्शन वर क्लिक करा. आता Extension हे ऑप्शन येईल. त्याच Extension ऑप्शन वर क्लिक करा.
-आता तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल.त्या विंडोच्या एकदम खालच्या भागाकडे जा.तिथे जाऊन Get More Extensions वरती क्लिक करा.यानंतर सर्च बारमध्ये जाऊन Mailtrack for Gmail & Inbox :Email tracking लिहुन ते सर्च करा.
-आता ते डाऊनलोड करा आणि क्रोम मध्ये इन्स्टॉल करा. त्यानंतर तिथे तुमच्याकडून Gmail login मागितले जाईल.एखदा लॉगिन केल्यानंतर ऍक्टिव्हेट मेलट्रॅक वर क्लिक करा. यानंतर ऍक्टिव्हेट झाला की तिथे येणाऱ्या Allow च्या ऑप्शनवर क्लिक करा.
-यानंतर Gmail च्या टॅब मध्ये जा आणि कोणालाही ई-मेल पाठवा. यानंतर जेव्हा कधी तुम्ही पाठवलेला मेल समोरचा माणूस वाचेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल की तुमचा मेल समोरच्याने कधी वाचला. सोबतच तुमच्या मेल इनबॉक्स मध्ये व्हाट्सअप सारखे दोन ब्लू टिक सुद्धा तुम्हाला दिसतील.
-अशा पद्धतीने मेल मध्ये येणारा हा अडथळा दूर होवू शकतो.आता याच्यापुढे तुम्ही कोणालाही ई-मेल पाठवला तर तुम्हाला तुम्ही पाठवलेला ईमेल त्याने वाचला आहे की नाही याचे उत्तर मिळू शकते.