Lava Yuva 2 Pro Launch : तुम्हाला जर कमी किंमतीत चांगली सुविधा देणारा स्मार्टफोन हवा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण म्हणजे नुकताच लावा (Lava) कंपनीने आपला एन्ट्री लेव्हल Yuva 2 pro भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला MediaTek Helio G37 चिपसेट, 13MP AI ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5,000 MAH बॅटरी मिळत आहे. कंपनीने स्मार्टफोनमध्ये अतिरिक्त 3GB व्हर्च्युअल रॅम आणि 4GB रॅमचा सपोर्ट दिला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्मार्टफोनमध्ये प्रीमियम ग्लास फिनिश देण्यात आला आहे.
Lava Yuva 2 Pro किंमत आणि उपलब्धता :
Lava Yuva 2 Pro भारतात फक्त एकाच स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोन व्हेरिएंटमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज आहे. या स्मार्टफोनच्या मॉडेलची किंमत 7,999 रुपये आहे. कलर ऑप्शनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ग्लास व्हाईट, ग्लास लॅव्हेंडर आणि ग्लास ग्रीन कलर व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे. तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्ही मल्टी-ब्रँड ऑफलाईन रिटेल स्टोअर, लावाच्या अधिकृत वेबसाईट आणि ऑनलाईन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून तो खरेदी करू शकता.
Lava Yuva 2 Pro ची वैशिष्ट्ये :
1. डिस्प्ले : 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले
2. प्रोसेसर : MediaTek Helio G37 चिपसेट
3. कॅमेरा : ट्रिपल रिअर कॅमेरा, 13MP प्राथमिक सेन्सर
4. सेल्फी कॅमेरा : 5MP फ्रंट फेसिंग कॅमेरा
5. बॅटरी : 5,000mAh बॅटरी
6. ऑपरेटिंग सिस्टम : Android 12
Lava Yuva 2 Pro मध्ये तुम्हाला 64GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. Lava Yuva 2 Pro मधील इनबिल्ट कॅमेरा फीचरमध्ये ब्युटी, एचडीआर, नाईट, पोर्ट्रेट, एआय, प्रो, पॅनोरमा, स्लो मोशन, फिल्टर्स, जीआयएफ, टाइमलॅप्स आणि इंटेलिजेंट स्कॅनिंग सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या स्मार्टफोनबद्दल कंपनीने दावा केला आहे की, स्मार्टफोनला Android 13 अपग्रेड, दोन वर्षांचं सिक्युरिटी अपडेट मिळेल.
Poco C55 सुद्धा लॉन्च झाला
Poco ने आपला नवीन स्मार्टफोन 'Poco C55' देखील लॉन्च केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन अतिशय कमी किंमतीत लॉन्च केला आहे. त्यामुळे ज्यांना Android चा अगदी स्वस्तात आनंद घ्यायचा आहे अशा लोकांसाठी Poco C55 हा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. Poco च्या 4/64GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे.
महत्त्वाच्या बातम्या :