Lava creates Guinness World Record : 15 ऑगस्ट चा दिवस जसजसा जवळ येतोय तशी सगळ्यांची उत्सुकता वाढलीय. यंदा आपण 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यापूर्वी भारतीय मोबाईल निर्माता कंपनी लावाने (Lava) एक नवा विक्रम केला आहे. या कंपनीने नोएडामधील एका मॉलमध्ये तब्बल 1206 अँड्रॉईड स्मार्टफोन वापरून सर्वात मोठा अॅनिमेटेड राष्ट्रध्वज तयार केला आहे. या अनोख्या कामगिरीबद्दल कंपनीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला आहे. कंपनीने ध्वज तयार करण्यासाठी लावा ब्लेझ 2 स्मार्टफोनचा वापर केला. या संपूर्ण घटनेदरम्यान गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी तिथे उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी हे प्रमाणित केले की स्मार्टफोनचे वैशिष्ट्य असलेले मोज़ेक हा एक नवीन जागतिक विक्रम आहे.


यावेळी बोलताना लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि बिझनेस हेड सुनील रैना म्हणाले, “भारताने भारतीय ध्वजाच्या आकारात सर्वात मोठा अॅनिमेटेड मोबाईल फोन मोज़ेक बनवण्याचा विक्रम मोडताना पाहून आम्हाला खूप अभिमान वाटतो. ही देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनाला समर्पित आहे आणि अग्नी 2 च्या यशाचा उत्सव आहे ज्याने भारतीय तंत्रज्ञान उत्पादने यशस्वी होऊ शकत नाहीत ही कल्पना खोटी ठरवली आहे. हा विक्रम प्रस्थापित करताना कंपनीला अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.






दुसऱ्या तिमाहीत मोठ्या कंपनीची वाढ 53% पर्यंत 


मोबाईल फोन बनवणाऱ्या लावाची नोएडामध्ये मोठी फॅक्टरी आहे. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत या कारखान्यात दरवर्षी 42.52 मिलियन फीचर मोबाईल बनवले जात होते. अलीकडेच कंपनीने Lava Agni 2, Lava Blaze 5G आणि Lava Yuva 2 Pro यासह स्मार्टफोनची विस्तृत रेंज लॉन्च केली आहे. काउंटरपॉइंट रिसर्चनुसार, 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत लावाने 53% वार्षिक वाढ नोंदवली आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


WhatsApp : आता एकाच वेळी अॅपमध्ये अनेक अकाउंट ओपन करता येणार; जाणून घ्या व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरबद्दल