iQOO Neo 7 ची किंमत किती?
iQOO Neo 7 ची डिझाईन मागच्या वर्षी लॉन्च केलेल्या iQOO Neo 6 सारखीच आहे. पण, नवीन स्मार्टफोनमध्ये तुम्हाला कलर ऑप्शनमध्ये बदल मिळतील. आज दुपारी 1 वाजल्यापासून तुम्ही हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट Amazon किंवा IQOO च्या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करु शकता. iQOO Neo 7 कंपनीने 2 स्टोरेज पर्याय 8/128GB आणि 12/256GB व्हेरियंटमध्ये लॉन्च केला आहे. iQOO Neo 7 च्या 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज आहे. तर, या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये आहे. तर 12GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेजसह व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये आहे.
लॉन्च होताच 1500 ची सूट मिळेल
iQOO च्या नवीन स्मार्टफोन iQOO Neo 7 वर ग्राहकांना 1500 रुपयांची सूट दिली जात आहे. जेव्हा तुम्ही HDFC, ICICI किंवा SBI बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पैसे देऊन स्मार्टफोन खरेदी कराल तेव्हा तुम्हाला ही सूट मिळेल. याशिवाय कंपनीने तुम्हाला 2,000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंटही ऑफर केला आहे.
iQOO Neo 7 चे स्पेसिफिकेशन्स
iQOO Neo 7 मध्ये, तुम्हाला MediaTek Dimension 8200 SoC चा सपोर्ट मिळेल. हा स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 120W फास्ट चार्जिंग मिळेल, ज्यानुसार तुम्ही केवळ 10 मिनिटांत मोबाईल 50 टक्के चार्ज करु शकाल. iQOO Neo 7 मध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल ज्यामध्ये 64 मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल मायक्रो कॅमेरा असेल. त्याच वेळी, फ्रंटला 16 मेगापिक्सेल कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी असेल.
Realme GT Neo 5 लवकरच होणार लॉन्च
Realme ने आपला नवीन स्मार्टफोन Realme GT New 5 जागतिक स्तरावर दोन बॅटरी ऑप्शन्ससह लॉन्च केला होता. लवकरच हा स्मार्टफोन भारतातही लॉन्च होईल. Realme GT Neo 5 मध्ये, ग्राहकांना वेगवेगळ्या फास्ट चार्जिंग ऑप्शनसह दोन बॅटरी पर्याय मिळतील. चीनच्या बाजारात Realme GT New 5 च्या 240W फास्ट चार्जिंग व्हेरिएंटची किंमत 39,000 रुपये आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Best Smartphones: 200MP कॅमेरा आणि 256GB स्टोरेज, प्रीमियम फोनमध्ये हे आहे सर्वोत्तम पर्याय