IQOO Neo 7 Pro Price in India : आयक्यूने भन्नाट स्मार्टफोन बाजारात आणला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक भन्नाट फीचर्ससह एक स्वतंत्र गेमिंग चिपही मिळणार आहे. यामुळे हा स्मार्टफोन गेमिंगची आवड असणाऱ्या युजर्सच्या पसंतीस उतरेल, अशी अपेक्षा आहे. या स्मार्टफोनची माहिती नुकतीच लीक झाली आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, IQOO Neo 7 Pro हा स्मार्टफोन पुढील महिन्यात लाँच होऊ शकतो. पण हा फोन लाँच करण्याआधीच शॉपिंग वेबसाईट ॲमेझॉनकडून IQOO Neo 7 Pro 5G ची किंमत जाहीर करण्यात आली आहे. कंपनीने 'ॲमेझॉन प्राईम डे सेल'च्या बॅनरखाली चुकून ही किंमत उघड केल्याचं समोर आलं आहे. या लीक झालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोन अनेक भन्नाट फीचर्स  मिळणार आहेत. कंपनीने हा स्मार्टफोन विक्रीसाठी ॲमेझॉनवर (Amazon) उपलब्ध करुन दिला आहे. या फोनची किंमत 33,999 रुपये इतकी असून 4 जुलै रोजी लाँच होऊ शकतो.


या स्मार्टफोनची किंमत ॲमेझॉनने चुकून जाहीर केली आहे. यामुळे फोनची खरी किंमत लाँचिंगच्या दिवशीच समजू शकते. सध्या तरी हे स्पष्ट नाही की, ॲमेझॉनवर जाहीर करण्यात आलेली किंमत ऑफरच्या आधीची आहे की कोणत्याही ऑफर्सशिवाय आहे. टिपस्टर योगेश बरार यांच्या म्हणण्यानुसार, कंपनी हा फोन 35 ते 36 हजार रुपये किंमतीत लाँच करण्याची शक्यता आहे. 






या स्मार्टफोनची डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्स 


या स्मार्टफोनच्या टीजरनुसार, तुम्हाला IQOO Neo 7 Pro 5G च्या पाठीमागील बाजूला लेदर फिनिश मिळणार आहे. हा स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसोबत उपलब्ध होणार आहे.  या फोनच्या सर्व बाजूंना गोल्डन अॅक्सेंटचा राऊंड कार्नर देण्यात आला आहे. या फोनच्या समोरील बाजूला अँड्रॉईड फोनसारखं एक पंच-होल डिझाइन असणार आहे.


IQOO Neo 7 Pro 5G मध्ये  6.78 इंच डिस्प्ले 120hz च्या रिफ्रेश रेटसह मिळू शकतो. 
IQOO Neo 7 Pro 5G स्मार्टफोन Qualcomm's Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटसह उपलब्ध होऊ शकतो.
IQOO Neo 7 Pro 5G मध्ये 5000mAh इतक्या क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. 
IQOO Neo 7 Pro 5G मध्ये 120 वॅटचा फास्ट चार्जिग सपार्ट मिळणार आहे.
IQOO Neo 7 Pro 5G मध्ये ट्रिपल सेटअप कॅमेरा दिलेला आहे. यासोबत या फोनमध्ये स्वतंत्र गेमिंग चिप मिळणार आहे. यामुळे युजर्सना गेमिंगचा भन्नाट अनुभव मिळणार आहे.


पुढील महिन्यात हे 2 स्मार्टफोन होणार लाँच


दुसरीकडे वनप्लस कंपनी पुढील महिन्यात 5 जुलै रोजी दोन नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हे स्मार्टफोन Oneplus Nord 3 आणि CE 3 हे आहेत. यातील Oneplus Nord 3 च्या फोनबद्दल ग्राहकांना प्रचंड उत्सुकता आहे. या लीक झालेल्या माहितीनुसार, कंपनी Oneplus Nord 3 स्मार्टफोन 2 स्टोरेजमध्ये लाँच करु शकते. हा फोन 8GB रॅम आणि 128GB एक्सटर्नल स्टोरेज, 12GB रॅम आणि 256GB एक्सटर्नल स्टोरेजसह उपलब्ध होऊ शकतो. प्रसिद्ध टिपस्टर अभिषेक यादव यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोची किंमत अनुक्रमे 32,999 रुपये आणि 36,999 रुपये इतकी असू शकते.


इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा :


Samsung Galaxy Z Flip 5 : Samsung Galaxy Z Flip 5 जुलै महिन्यात होणार लाँच, इतकी असेल किंमत