iPhone7 आणि iPhone7 प्लसवर खास सूट!
ही सूट तुम्हाला एक्सचेंज ऑफरवर मिळू शकते. आयफोन 6s प्लसवर सर्वाधिक सूट मिळत आहे.
एक्सचेंज ऑफरनुसार, आयफोन7 आणि आयफोन 7 प्लसवर सर्वाधिक 25,100 रुपयांची सूट मिळू शकते.
आयफोन 7 प्लसचा 128 जीबी मॉडेल 77,900 आणि 256 जीबी मॉडेल 87,400 रुपयात खरेदी करु शकता.
याच ऑफरनुसार आयफोन 7 प्लस 32 जीबी 68,400 रुपयात मिळू शकतो.
आयफोन7 128 जीबी मॉडेल ऑफरमध्ये तुम्हाला 66,500 रुपयात मिळेल. याची मूळ किंमत 70,000 रुपये आहे. तर 256 जीबी मॉडेलची किंमत 80,000 रुपये असून ऑफरमध्ये हा स्मार्टफोन 76,000 रुपयात उपलब्ध आहे.
ही ऑफर कलर व्हेरिएंटनुसार मिळणार आहे. आयफोन 7च्या 32 जीबी मॉडेलची किंमत 60,000 आहे. पण यावर 5 टक्के सूट असल्यानं हा स्मार्टफोन तुम्हाला 57,000 रु. मिळेल.
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टनं आयफोन 7 आणि 7प्लसवर खास ऑफर दिली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना थेट 5 टक्के सरळ सूट मिळणार आहे. तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये इतर स्मार्टफोन आणि आयफोन डिव्हाईस एक्सचेंज केल्यास अधिक सूट मिळू शकते.