Big Discount on iPhone 15 : आयफोन (iPhone) वर 50 हजार रुपयांची संधी आहे. फ्लिपकार्टवर (Flipkart) मेगा सेविंग्ज डे सेल (Flipkart Mega Savings Day Deals) सुरु आहे. यामध्ये विविध वस्तूंवर बंपर ऑफर देण्यात येत आहेत. तुम्ही आयफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. फ्लिपकार्टवर मेगा सेविंग्ज डे सेलमध्ये (Flipkart Mega Savings Day Sale) आयफोनवर बंपर सूट देण्यात येत आहे. या बंपर ऑफरमध्ये तुम्हाला आयफोन 15 ( iPhone 15) वर 50 हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ते जाणून घ्या.
आयफोन घेण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल आणि भरघोस सूट किंवा चांगल्या ऑफरच्या प्रतिक्षेत असाल, तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला आयफोन 15 वर 50 हजार रुपयेपर्यंत सूट मिळेल, पण यासाठी तुमच्याकडे आता शेवटची संधी आहे. कारण फिल्पकार्टच्या सेलची शेवटची तारीख 15 एप्रिल म्हणजे आज आहे.
आयफोनवर 50 हजार रुपयांची सवलत
तुम्ही फ्लिपकार्ट मेगा सेविंग्स डे सेलमध्ये आयफोन 15 ( iPhone 15) खरेदी केला तर तुमचे पैसे वाचतील. लॉन्चिंगच्या वेळी आयफोन 15 ची किंमत 79 हजार 900 रुपये होती, पण iPhone 15 आता फ्लिपकार्टवर तुम्हाला फक्त 65 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. iPhone 14 Pro Max एक्सचेंज केल्यानंतर तुम्हाला या फोनवर 50 हजार रुपयांची सूट मिळेल.
एक्सचेंज ऑफरमध्ये बंपर सूट ( Offers on Exchange )
जर तुम्ही एक्सचेंज ऑप्शनमध्ये iPhone 13 दिला तुम्हाला त्यावर 26 हजार रुपयांची सूट मिळेल, तर iPhone 14 वर 29 हजार रुपयांची सूट मिळत आहे. जर तुम्ही आयफोन 14 प्रो मॅक्सची एक्सचेंज केला तर तुम्हाला सर्वाधिक सवलत मिळेल.
ऑफर मिळवण्याची आज शेवटची संधी
महत्त्वाचं म्हणजे या सेलची अंतिम तारीख आज म्हणजे 15 एप्रिल आहे. त्यामुळे जर तुम्हालाही या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही फ्लिपकार्टवर जाऊन फोन खरेदी करू शकता.
आयफोन 15 स्पेशिफिकेशन्स ( iPhone Specifications )
- आयफोन 15 ( iPhone 15) मध्ये 6.1 इंच डिस्प्ले आहे.
- याच्या मेन कॅमेरा 48MP आहे आणि ड्युअल कॅमेरा 12MP पोर्ट्रेट कॅमेरा आहे.
- या फोनमध्ये सेकंड जनरेशन अल्ट्रा-वाइड बँड चिप आहे, यामुळे तुम्ही तुमचे Apple डिव्हाइस सहज शोधू शकता.
- या फोनमध्ये तुम्हाला बायोनिक A16 चिप सह फास्टेस डेटा ट्रान्सफर स्पीडसाठी USB 3.2 Gen 5 चा सपोर्ट देखील मिळतो.