iPhone 12 vs iQOO 9T 5G : अँड्रॉइड आणि आयफोनमधील स्पर्धा ही वर्षानुवर्षे सुरूच आहे. या दोन्ही फोनची तुलना आजतागायत संपलेली नाही. नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी लोक अजूनही iPhone आणि Android च्या समान रेंजमधील फोनची तुलना करतात. यातच आम्ही तुम्हाला Apple iPhone 12 आणि iQOO 9T 5G या स्मार्टफोनबद्दल माहिती सांगणार आहोत. हे दोन्ही 5G आणि फ्लॅगशिप फोन आहेत. दोन्ही फोन उत्कृष्ट फीचर्ससह येतात. या बातमी आम्ही दोन्ही फोनची तुलना करणार आहोत, जेणेकरून तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य फोन निवडू शकता.
iPhone 12 vs iQOO 9T 5G : डिस्प्ले
iPhone 12 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले (1170 x 2532), आणि iQOO 9T 5G मध्ये 6.78-इंचाचा AMOLED (1080 x 2400) डिस्प्ले आहे.
iPhone 12 vs iQOO 9T 5G : ऑपरेटिंग सिस्टम
Apple च्या iPhone 12 मध्ये तुम्हाला iOS 16.2 मिळतो आणि iQOO 9T 5G मध्ये तुम्हाला Android 12 वर आधारित Funtouch 12 ऑपरेटिंग सिस्टम मिळते.
iPhone 12 vs iQOO 9T 5G : प्रोसेसर
iPhone 12 मध्ये यूजर्सना A14 Bionic चिपसेट मिळतो आणि iQOO 9T 5G मध्ये Octa Core Qualcomm SM8475 Snapdragon 8+ Gen 1 (4 nm) प्रोसेसर देण्यात आला आहे.
iPhone 12 vs iQOO 9T 5G : प्रकार
iPhone 12 4GB RAM आणि 64GB स्टोरेज, 4GB RAM आणि 128GB स्टोरेज, 4GB RAM आणि 256GB स्टोरेजमध्ये येतो. तर iQOO 9T 5G 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे.
iPhone 12 vs iQOO 9T 5G : कॅमेरा
कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर iPhone 12 च्या मागील बाजूस 12MP + 12MP कॅमेरा आणि समोर 12MP कॅमेरा देण्यात आला आहे. iQOO 9T 5G मध्ये मागील बाजूस 50MP + 12MP + 13MP कॅमेरा आणि समोर 16MP कॅमेरा आहे.
iPhone 12 vs iQOO 9T 5G : बॅटरी
iPhone 12 मध्ये 2815mAh बॅटरी आहे, तर iQOO 9T 5G 120W चार्जिंग सपोर्टसह 4700mAh बॅटरी देण्यात आली आहे.
iPhone 12 vs iQOO 9T 5G : किंमत
iPhone 12 ची सुरुवातीची किंमत Amazon आणि Flipkart वर 55,900 रुपये आहे. तुम्ही Amazon किंवा Flipkart च्या कोणत्याही सेलमध्ये हा फोन अधिक स्वस्तात खरेदी करू शकता. iQOO 9T 5G च्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे.