Inverter AC Vs Non Inverter AC: फेब्रुवारी महिना संपताच भयंकर उन्हाळा सुरू झाला आहे. मुंबई सारख्या शहरताही तापमान आता 39 अंश सेल्सियसवर पोहचला असून एसीशिवाय राहणे शक्य नाही. बर्‍याच लोकांच्या घरात आधीच एअर कंडिशनर आहेत. बरेच लोक या उन्हाळ्यात नवीन एअर कंडिशनर घेण्याचा विचार करत असतील. जर तुम्हीही नवीन एअर कंडिशनर घरी आणण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आधी इन्व्हर्टर आणि नॉन-इनव्हर्टर एसीमधील फरक माहित असणे आवश्यक आहे. नाही तयार तुम्हाला होऊ शकतं मोठं नुकसान. आज आम्ही तुम्हाला इन्व्हर्टर आणि नॉन-इनव्हर्टर एसीमधील फरक आणि कोणता एसी खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, याबाबत माहिती सांगणार आहोत.


Inverter AC Vs Non Inverter AC: इन्व्हर्टर एसी म्हणजे काय?


इन्व्हर्टर एसीमध्ये इन्व्हर्टर तंत्रज्ञान दिलेले आहे. जे इलेक्ट्रिक व्होल्टेज, करंट आणि फ्रिक्वेन्सी नियंत्रित करण्याचे काम करते. नॉन-इन्व्हर्टर एसीमध्ये, कंप्रेसर एकतर चालू किंवा बंद असतो. ज्यामुळे तापमानात सतत चढ-उतार होत राहते. तसेच इन्व्हर्टर एसी कूलिंगच्या गरजेनुसार कंप्रेसरला वेगवेगळ्या स्पीड मोडेमध्ये सुरू ठवते, ज्यामुळे तापमान स्थिर राहते आणि चढ-उतार होत नाहीत.


Inverter AC Vs Non Inverter AC: इन्व्हर्टर आणि नॉन-इन्व्हर्टर तंत्रज्ञानामध्ये काय आहे फरक


1.5-टन इन्व्हर्टर एसी 0.3-टन ते 1.5-टन दरम्यान काम करू शकतो. तर नॉन-इनव्हर्टर एसी नेहमी 1.5-टन चालतो.


Inverter AC Vs Non Inverter AC: तापमान नियंत्रण


इन्व्हर्टर एसी तापमानात चढ-उतार होत नाही. याच्या मदतीने तुम्ही तापमान स्थिर ठेवू शकता. समजा तुम्ही AC 24-डिग्रीवर सेट केला असेल, तर इन्व्हर्टर एसी समान तापमान राखेल, तर नॉन-इनव्हर्टर एसी तापमान 1 किंवा 2 अंशांनी वाढवू किंवा कमी करू शते.


Inverter AC Vs Non Inverter AC: किंमत आणि वीज बिल


इन्व्हर्टर एसी महाग आहेत. परंतु ते अधिक ऊर्जा कार्यक्षम देखील आहेत. इन्व्हर्टर एसी तुमच्या वीज बिलात पैसे वाचवू शकतात. दुसरीकडे इन्व्हर्टर नसलेले एसी कमी पैशात येतात. परंतु ते जास्त वीज वापरतात. त्यामुळे वीज बिल जास्त येते.


Inverter AC Vs Non Inverter AC: कोणता एसी खरेदी करावा?


तुम्हाला कमी वीज वापर आणि आरामदायी कूलिंगचा अनुभव असलेला एसी हवा असेल, तर इन्व्हर्टर एसी हा एक चांगला पर्याय आहे. तसेच तुमचे बजेट कमी असल्यास, नॉन-इन्व्हर्टर एसी हा एक चांगला पर्याय आहे. मात्र यामुळे वीज बिल जास्त येऊ शातो.