Instagram Reel Voice : आजकाल इन्स्टाग्राम रील्सची (Instagram) क्रेझ खूप सुरू आहे. खरं तर इन्स्टाग्रामवर रिल्स बनवून लोक पैसे कमवू लागले आहेत आणि मेटाने आपल्या शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक सुविधा दिल्या आहेत, ज्यामुळे युजर्ससाठी या अॅपचा वापर करून शॉर्ट व्हिडिओ कंटेंट तयार करण्याचा आणि मग जास्तीत जास्त व्ह्यूज मिळवून पैसे कमवताना दिसत आहे. या रिल्समुळे अनेकजण लखपती झालेले आहेत.
जर तुम्ही इन्स्टाग्राम रील्स बनवत असाल किंवा बघत असाल तर गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही लोकप्रिय AI आवाजात अनेक रील्स ऐकल्या असतील. जर तुम्ही तो आवाज लक्षात घेतला असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की अनेक जण एकाच आवाजात रील्स बनवून इन्स्टाग्रामवर रील्स अपलोड करत आहेत आणि लोकांना तो खूप आवडतही आहे.
एआय व्हॉईससह रील्स कसे बनवावे?
खरं तर एआय व्हॉईस आजकाल खूप वापरला जात आहे. तुम्हालाही या आवाजाचा वापर करून रील्स बनवायचे असतील आणि लोकप्रिय व्हायचे असतील तर आम्ही तुम्हाला स्टेप-वाइज प्रोसेस फॉलो करावी लागेल.
स्टेप्स कशा असलीत जाणून घ्या
स्टेप 1: यासाठी तुम्हाला आधी तुमच्या फोनमध्ये गुगल किंवा क्रोमवर जावे लागेल.
स्टेप 2 : त्यात Eleven Labs सुरु करावे लागतील.
स्टेप 3: त्यानंतर तुम्हाला तुमच्या जीमेल आयडीने साइन अप करावं लागेल.
स्टेप 4: आता व्हॉइस लायब्ररीमध्ये जावं लागेल.
स्टेप 5: तिथे तुम्हाला Neal नावाचा एआय व्हॉईस शोधावा लागेल.
स्टेप 6: आता हा आवाज सेव्ह करा.
स्टेप 7: नंतर आपली स्क्रिप्ट टाइप करा.
स्टेप 8: ज्या भाषेत तुम्हाला मजकूर आणि व्हॉईस ओव्हर करायचं आहे. ती भाषा निवडा.
या स्टेप्समुळे AI व्हॉईस जनरेट होईल
त्यानंतर तो कंटेंट या पॉप्युलर एआय व्हॉईसमध्ये जनरेट होईल, जो तुम्ही तुमच्या इन्स्टाग्राम रील्समध्ये वापरू शकता. हा एआय आवाजाला भारतात खूप पसंती मिळत आहे. अशावेळी जर तुम्हाला या AI व्हॉईसचा वापर करून इन्स्टाग्राम किंवा फेसबुकसाठी रील्स तयार करायचे असतील तर तुम्ही वर सांगितलेल्या प्रोसेसचा वापर करू शकता.
इतर महत्वाची बातमी-
Facebook Feature: Facebook मध्ये आलं नवीन लिंक हिस्ट्री फीचर, कसं वापराल आणि काय आहेत फायदे?