Instagram night time nudges : सोशल मीडिया (Instagram) प्लॅटफॉर्मवर लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी मेटा सतत काम करत असते. त्यासाठी कंपनीवर प्रचंड दबावही टाकला जात आहे. अलीकडेच मेटाने मुलांच्या सुरक्षेसाठी इन्स्टाग्राममध्ये काही नवीन फीचर्स जोडले आहेत, जेणेकरून त्यांना एक्सप्लोर आणि रील्समध्ये क्राईम आणि सॉफ्टपॉर्न कंटेंट (content) दिसणार नाही. आता कंपनी चाइल्ड सेफ्टीसाठी  (Child Safety) प्लॅटफॉर्ममध्ये आणखी एक फिचर जोडत आहे. 


टेकक्रंचच्या रिपोर्टनुसार, इन्स्टाग्राम लहान मुलांसाठी नाईटटाइम फीचर अॅड आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर रात्री 10 नंतर मुलांना प्लॅटफॉर्मपासून दूर राहण्याचा खास मेसेज दाखवणार आहे. मुलांना लेट नाईट अॅप वापरण्यापासून रोखणे हा या फीचरचा उद्देश आहे. कंपनी एक पॉपअप दाखवेल ज्यात टाईम फॉर अ ब्रेक असे लिहिले जाईल, तसेच खूप उशीर झाला आहे, आता आपण इन्स्टाग्राम बंद करावे, असे लिहिले जाईल. लहान मुलांनी 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ इन्स्टाग्राम प्ले केल्यास हा मेसेज चाइल्ड अकाऊंट किंवा अकाऊंटमध्ये रात्री 10 नंतर दिसेल.


पॉप अप कायमचं बंद करता येणार नाही!


मुले हा पॉपअप मेसेज कायमचा बंद करू शकत नाहीत, म्हणजेच हे ऑप्ट-इन किंवा आऊट फीचर नाही. कंपनी तुम्हाला आपोआप हा मेसेज दाखवेल, जो युजर्स फक्त क्लोज करू शकतात.  युजर्सच्या सुरक्षेसाठी इन्स्टाग्राममध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. स्क्रीनटाइम कमी करण्यासाठी कंपनीने अॅपमध्ये टेक अ ब्रेक, बर्ट मोड सारखे फिचर्स दिले आहेत. ते चालू करून तुम्ही तुमचा स्क्रीन टाईम कमी करू शकता.


'तो' कंटेंट दिसणार नाही!



अनेकदा इंस्टाग्रामवर मुलांना कोणताही कंटेंट दाखवला जातो. या कंटेंटमुळे मुलांच्या मनावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोशल मीडियामध्ये नावाजलेली कंपनी मेटा हीने एक ब्लॉगपोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये कंपनीने लहान मुलांना प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या सेनसिटीव्ह कंटेंटच्या एक्सपोजरपासून वाचवण्यासाठी नवीन टुल्सची माहिती शेअर केली आहे. यात मेटाने म्हटले आहे की, कंपनी याच्यापुढे मुलांना सेन्सिटिव्ह कंटेंट दाखवणार नाही. सोबतच काही विशेष प्रकारच्या टर्म्स  मुलांसाठी रेस्ट्रिक्ट केलं जाणार. जर कोणचंही मुल या विषयाचा कंटेंट मेटा प्लॅटफॉर्मवर सर्च करत असेल तर कंपनी त्याला तो कंटेंट दाखवण्याच्या ऐवजी वेगळ्या पद्धतीचा कंटेन्ट दाखवला जाईल. 


इतर महत्वाची बातमी-


Facebook Pregnancy Job Scam : महिलेला प्रेग्नंट करा अन् 10 लाख मिळवा; फेसबुक प्रेग्नंसी स्कॅम नेमका आहे तरी काय?