Instagram Sever Down : सोशल मीडिया ॲप इंस्टाग्रामचा (Instagram) सर्व्हर आज पहाटे डाउन झाला होता. आता ही सेवा पूर्ववत (Instagram Sever Updates) झाली आहे. गुरुवारी पहाटे युजर्सना इंस्टाग्रामवर लॉग इन करण्यात अडचणी येत होत्या. मात्र आता कंपनीचा सर्व्हर पूर्ववत झाला असून सर्व सेवाही सुरळीत झाल्या आहेत. कंपनी सेवा पूर्ववत झाल्याचं सांगत यामागचं कारण सांगितलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे इंस्टाग्रामचा सर्व्हर डाऊन (Instagram Down) झाल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. 

Continues below advertisement

इंस्टाग्रामची सेवा पूर्ववत

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम गुरुवारी पहाटे डाउन होतं. जगभरातील युजर्सना इंस्टाग्रामवर लॉग इन करण्यात आणि ॲप वापरण्यात अडचणी येत होत्या. अनेक तास जगभरात इंस्टाग्रामची सेवा ठप्प झाली होती. मात्र, इंस्टाग्रामची ठप्प झालेली सेवा पुन्हा एकदा पूर्ववत झाली आहेत. कंपनीने सर्व्हर डाऊन होण्याचं कारण तांत्रिक समस्या असल्याचं सांगितलं आहे. 

युजर्सना लॉग इन करण्यात अडचणी

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट्स क्रॅश किंवा डाउन होण्याच्या घटनांची माहिती देणारी वेबसाइट डाऊन डिटेक्टरच्या (DownDetector) मते, गुरुवारी सकाळी युजर्सना इंस्टाग्राम चालवण्यात अडचणी येत होत्या. डाऊन डिटेक्टर वेबसाईटच्या मते, 30,000 हून अधिक युजर्संनी इंस्टाग्राम (Instagram) वापरण्यात अडचणी येत होत्या. या युजर्सने तक्रारी नोंदवल्या आहेत.

Continues below advertisement

इंस्टाग्राम डाऊन झाल्यावर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

 

 

 

 

 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Instagram : इंस्टाग्रामचं नवं फिचर, आता पोस्ट आणि रील्ससाठी QR Code