WhatsApp message : तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला जर व्हॉट्सअॅपवर मेसेज (WhatsApp Messages) करायचा असेल तर त्याचा नंबर सेव्ह करावा लागतो. तुम्हाला त्या व्यक्तिला नंबर सेव्ह करायची इच्छा नसतानाही नंबर सेव्ह करावा लागतो. मात्र, आता तुम्हाला नंबर सेव्ह न करताही संबंधित व्यक्तिला व्हॉट्सअॅपवर मेसेज करता येणार आहे. तुम्हाला त्या व्यक्तिचा नंबर सेव्ह करण्याची गरज नाही.
कधी कधी आपल्याला व्हॉट्सअॅपवर एखाद्याला त्वरित संदेश पाठवायचा असतो. त्यावेळी आपल्याकडे त्या व्यक्तीचा नंबर सेव्ह नसतो. तेव्हा आपल्याला थोडी लांबलचक प्रक्रिया फॉलो करावी लागते. त्याचा नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करावा लागतो. मात्र, आता फोनमध्ये नंबर सेव्ह करण्याची गरज नाही.
'या' आठ स्टेप्स फॉलो करा
1) तुम्हाला ज्या मोबाईल नंबरवर मेसेज पाठवायचा आहे, तो नंबर सुरुवातीला कॉपी करा
2) त्यानंतर तुमच्या Android किंवा iPhone वर WhatsApp उघडा
3) खाली दिलेल्या New chat बटणवर क्लिक करा
4) त्यानंतर तुम्ही तुमची स्वतःचे प्रोफाइल निवडा
5) चॅटमध्ये नंबर पेस्ट करा आणि सेंड प्रेस करा
6) त्यानंतर पेस्ट केलेल्या नंबरवर क्लिक करा
7) ज्या व्यक्तिला मेसेज करायचा आहे तो व्यक्ती WhatsApp वर असल्यास 'चॅट विथ...' पर्याय Open होईल. चॅट स्क्रीनवर प्रवेश करण्यासाठी त्यावर क्लिक करा
8) त्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तिला मेसेज करायचा आहे, त्याचा नंबर सेव्ह न करता मेसेज करु शकता
महत्त्वाच्या बातम्या: