Instagram Broadcast : इन्स्टाग्रामचा वापर(Instagram Reels) सध्या सगळेच भरपर प्रमाणात करताना(Instagram Broadcast ) दिसतात. मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत इन्स्टाग्रामवर दिवसभर रिल्स बघत असतात. फेसबुकनंतर इंस्टाग्रामला लोकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे लोक दिवसातला सगळ्यात जास्त वेळ किंवा रिकामा वेळ इंस्टाग्रामवर घालवत असतात. त्यासोबतच सध्या अनेकांना रिल्सस्टार व्हायचं आहे. त्यानुसार अनेकजण (Instagram Influencer) व्हिडीओ देखील बनवत असतात. रिल्स बनवून अनेल लोक लाखो रुपये कमवतात. मात्र अनेक लोक रिल्स बनवून देखील त्यांना हवे तेवढे व्ह्यूज मिळत नाही आणि फॉलोवर्स देखील वाढत नाही. अशातच आम्ही तुम्हाला एक जुगाड सांगत आहोत, ज्यातून तुम्हाला भरपूर लाइक्स आणि व्ह्यूज मिळून मोठी कमाई करता येईल.


इन्स्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनल कसे तयार करावे?



-सर्वात आधी तुम्हाला इन्स्टाग्राम ओपन करावं लागेल.
-यानंतर फीडच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात सेंड किंवा मेसेंजर बटण दिसेल, ज्यावर टॅप करावं लागेल.
-त्यावर टॅप करा आणि आपण आपल्या ब्रॉडकास्टमध्ये समाविष्ट करून घ्या.
-त्यानंतर क्रिएट ब्रॉडकास्टवर टॅप करा.
-इथे तुम्ही चॅनेलचे नाव देऊ शकता.
-यानंतर तुम्ही त्याचा फोटो टाकू शकता.
-अशा प्रकारे तुमचे चॅनेल तयार होईल.
-तुम्ही त्यात लोकांना जोडू शकता. 
-आपण Invite लिंक देखील पाठवू शकता.
-यात चॅट कंट्रोल करण्याचा पर्याय मिळेल.


इंस्टाग्रामवरुन रिल्स कसे डाऊलनोड कराल?


इन्स्टाग्रामकडून आता पब्लिक रील डाऊनलोड करण्याची परवानगी मिळाली आहे. इन्स्टाग्रामचे सीईओ अॅडम मोसेरी यांनी घोषणा केली आहे, आपण जागतिक स्तरावरील सार्वजनिक रील त्यांच्या अकाऊंटवरून डाउनलोड करू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे डाउनलोड केलेल्या रील्स थेट कॅमेरा रोलमध्ये किंवा गॅलरीत येतील. हे फीचर सुरुवातीला जूनमध्ये अमेरिकेत लाँच करण्यात आले होते पण आता डाऊनलोडचा पर्याय पब्लिक रील्ससाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हे फीचर आयओएस तसेच अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध असेल.त्यामुळे आता आपल्याचा हवं ते रील डाऊनलोड करता येणार आहे. लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकमध्ये असे फीचर देण्यात आला होता. यामध्ये युजर्सला शेअर बटणाच्या खाली डाऊनलोडचा पर्याय मिळत होता. मात्र खऱ्या निर्मात्यांच्या रील्सचा गैरवापर कोणीही करू शकतात त्यामुळे गॅलरीत सेव्ह केलेल्या रील्स वॉटरमार्कने दाखविण्यात येणार आहेत. यात क्रिएटर्सच्या इन्स्टाग्राम युझरशिपचा समावेश असेल.


इतर महत्वाची बातमी-


Apple Iphone Battery Life : iPhone डिस्चार्ज होईपर्यंत वापरताय? iPhone ची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 5 महत्वाच्या टिप्स