Apple Iphone Battery Life : अॅपल कंपनी आपल्या आयफोनच्या बॅटरीवर खूप (Apple Iphone Battery Life) काम करते. पण जसजसा मोबाईल जुना होतो  तसतशी बॅटरीची लाईफ कमी होऊ लागते. आयफोनची बॅटरी लाइफ सुधारण्यासाठी काही टिप्स आहेत हे तुम्हाला माहित आहे का? जर तुम्हीही आयफोन युजर असाल आणि बॅटरी लाइफ सुधारण्याचे मार्ग शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. खास पाच सोप्या टिप्स वापरुन जुन्या आयफोन मॉडेलची बॅटरी लाइफ  वाढवू शकणार आहोत.. 


चार्जिंग करताना कव्हरचा वापर करू नका...


अॅपलने मोबाईल चार्जिंग करताना विशिष्ट प्रकारच्या केसेसचा  (covers)वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. खरं तर आयफोन चार्जिंग करताना थोडे गरम होतात. त्यात केसेसदेखील गरम होतात. त्यामुळे चार्जिंग प्रक्रिया मंद होऊ शकते. याचा परिणाम आयफोनच्या बॅटरीच्या आरोग्यावर आणि चार्ज-होल्डिंग होऊ शकतो.
 


बॅटरी सेव्हर वापरा...


आयफोनवर बिल्ट-इन बॅटरी लाइफ वापरावे.हे आपल्या बॅटरी लाइफमध्ये सुधारणा करण्याचे काम करते. त्यामुळे बॅटरी बराच काळ टिकवण्यासाठी मदत होते. 



अॅप्स क्लिअर करू नका..


जर तुम्हाला तुमच्या आयफोनवरील कोणतेही न वापरलेले अ ॅप्स बंद करण्याची सवय असेल तर ती सवय बदलून टाका. जेव्हा आपण पुन्हा अॅप उघडता. अॅप पुन्हा उघडण्यासाठी अधिक ऊर्जेचा वापर करते. अशावेळी बॅकग्राऊंडमध्ये सर्व अॅप्स चालू ठेवा.


फोन अपडेट करत रहा..



 आयफोनमध्ये काही महिन्यांच्या अंतराने नवे अपडेट्स येत असतात. अनेकजण आपला मोबाईल अपडेट करत नाही. मोबाईलची बॅटरी वाचवण्यासाठी मोबाईल अपडेट करु नये, असं एक मिथक तयार झालं आहे. मात्र हे साफ खोटं आहे. आपला मोबाईल जेवढा अपडेट कराल तेवढा आपला मोबाईल फास्ट होईल आणि बॅटरीपण चांगली राहिल. 


चार्जिंग पूर्ण संपू देऊ नका...


तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुमच्या आयफोनची बॅटरी 25 टक्क्यांपर्यंत पोहोचते तेव्हा तुम्ही आयफोन चार्ज करायला सुरुवात केली पाहिजे. याशिवाय बॅटरी फक्त 85 टक्के चार्ज व्हायला हवी. सगळा मोबाईल डिस्चार्ज झाल्यावर मोबाईल चार्ज केल्यास बॅटरी लाईफ कमी होते. अनेक लोक पूर्ण मोबाईल बंद होईपर्यंत वापरतात त्याने मोबाईलवरदेखील परिणाम होतो आणि त्यात सगळ्यात जास्त परिणाम बॅटरीवर होतो. त्यामुळे बॅटरी लाईफ वाचवायची असेल तर आपण मोबाईलची काळजी घेतली पाहिजे. 


इतर महत्वाची बातमी-


OPPO Reno 11 Pro Features : OPPO Reno 11 Pro लवकरच भारतात होणार लाँच होणार; दमदार फिचर्स लीक