How to solve Mobile Network: आपण सध्या 5G च्या काळात असलो तरी फोनवर बोलता बोलता अचानक नेटवर्क जातं आणि खोळंबा होतो. कितीही महागडा फोन आपल्याकडे असला तरी घराबाहेरून घरात गेल्यागेल्या अचानक खरख्रर ऐकू येते. एखाद्या खोलीतून रेंज मिळत नाही अशा समस्या तुम्हालाही येतात का? ही नेटवर्कची समस्या विशिष्ट सेटिंग करून चुटकीसरशी ही नेटवर्कची समस्या आपण सोडवू शकतो.
टेलिकॉम क्षेत्र सध्या नव्या वेगाने पुढे जाताना दिसत असताना एकीकडे इंटरनेटच्या वाढलेल्या किमती तर दुसरीकडे 4G -5G नेटवर्कच्या जाळ्यात आपण ओढले गेलो आहोत. आपल्या स्मार्टफोनमध्ये एवढ्या सुविधा असतानादेखील मोबाईल नेटवर्कची समस्या अजूनही आपल्याला त्रास देणारीच आहे. ऐन गरजेच्या वेळी नेटवर्क गुल होणं काही जणांना हे तर नेहमीचंच म्हणत नशीबावर घसरायला लावतं. पण या त्रासातून काही छोट्या सेटिंग करून सोडवता येऊ शकतं. यासाठी करांयचं काय?
फोन रिस्टार्ट करा
अनेकदा फोन रिस्टार्ट केल्याने नेटवर्कच्या काही छोट्या त्रूटी चटकन दूर होतात. जर तुम्हाला सतत मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळे येत असतील तर तुमचा फोन एकदा रिस्टार्ट करून पहावा. कधीकधी खूप वेळ फोन चालू असला की मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळा येऊ शकतो. काही मिनिटे मोबाईल बंद करून पुन्हा सुरु केल्याने नेटवर्क ब्लॉक सुटून काम नीट सुरु होईल.
एअरप्लेन मोड ऑन करणे
सारखे सारखे मोबाईल नेटवर्क जात असेल किंवा फोनवर बोलताना खरखर होत असेल तर या सोप्या पद्धतीने मोबाईल नेटवर्क पुन्हा एकदा रिस्टोअर होऊ शकतं. यासाठी तुमच्या फोनमधील विमानाचे चिन्ह असणारा एअरप्लेन मोड थोड्यावेळ ऑन करून बंद करावा. याने मोबाईल नेटवर्क पुन्हा सुरळीत होईल.
सॉफ्टवेअर अपडेट करा
बऱ्याचदा सॉफ्टवेअर अपडेटेड नसल्यानेही मोबाईल नेटवर्कची समस्या येऊ शकते. जर तुमचा फोनचे सॉफ्टवेअर अपडेट नसेल तर ते चेक करावे. आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये सॉफ्टवेअर अपडेटचा इशारा आला आहे का ते पाहून नवीन अपडेटेड सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे.
आपल्या फोनच्या सिग्नल स्ट्रेंथ चेक करा
तुमच्याही फोनचे नेटवर्क वारंवार जात असेल किंवा नेटवर्कमध्ये अडथळे येत असतील तर आपल्या फोनची सिग्नल स्ट्रेंथ चेक करा. खूपवेळा नेटवर्क कव्हरेज नसल्याची समस्या येत असेल तर नेटवर्क बूस्टरचाही वापर तुम्ही करू शकता.
सर्विस कंपनीला संपर्क साधा
जर या सोप्या टिप्सनेही नेटवर्कचा अडथळा दूर होत नसेल तर आपल्या सिमकार्डच्या सर्विस कंपनीला संपर्क साधून आपली अडचण त्यांना सांगावी. कधी कधी नेटवर्कचा अडथळा सिमकार्डमुळेही होऊ शकतो.