RBI Lokpal : हल्ली अनेक लोक ऑनलाइन शॉपिंग करतात. (Online shopping) फेसबुक (facebook), इन्स्टाग्राम () आणि अनेक शॉपिंग अॅप्सवर हजारो प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत, ज्यावर युजर्सना अनेक प्रकारचे ऑफर्स  (Online Shopping Offers) पाहायला मिळतात. युजर्स ऑफर्सपाहून आकर्षित होतात आणि नंतर क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट करुन प्रॉडक्ट ऑर्डर करतात. ऑर्डर आल्यानंतर युजर्सना प्रॉडक्ट आवडलं नाही तर ते परत करून पैसे परत मिळवण्याचा प्रयत्नही करतात. मात्र प्रॉडक्ट परत केल्यानंतर अनेकदा पैसे रिटर्न येत नाही. यावेळी युजर काय करू शकतो? तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. अशापरिस्थितीत युजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयकडे तक्रार करू शकतो आणि नुकसानभरपाईही मिळवू शकतो. त्याची संपूर्ण प्रक्रिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...


या स्टेप्स वापरुन तक्रार करा!


-यासाठी युजर्सला सर्वप्रथम आरबीआय लोकपालच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. 
-आपण (https://rbi.org.in/Scripts/Complaints.aspx) या लिंकवर क्लिक करून थेट अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता.
-आरबीआय लोकपालाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर युजर्सला कोणत्याही बँक, एनबीएफसी किंवा अशा अन्य कोणत्याही संस्थेविरोधात तक्रार दाखल करण्याचा पर्याय मिळेल.
-कोणाच्या विरोधात तक्रार करायची या पर्यायावर युजर्स क्लिक करतात. 
-त्यानंतर युजर्सना तक्रार दाखल करण्यासाठी तक्रार दाखल करण्याचा पर्याय मिळेल. 
-त्यानंतर युजर्सला आपलं नाव आणि नंबर टाकावा लागेल.
-त्यानंतर युजर्सच्या फोनमध्ये ओटीपी येईल. ते वेबसाईटवर टाकून क्लिक करावं लागेल.
-त्यानंतर तुमचा ओटीपी व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या तक्रारीची माहिती लिहावी लागेल.
-यासाठी युजर्सला तक्रारदाराचे नाव, फोन नंबर, ईमेल आयडी, राज्याचे नाव, तक्रार श्रेणी आणि त्यांचा पूर्ण पत्ता  भरावा लागेल. 
-हे सर्व भरल्यानंतर युजर्सला ज्या बँकेच्या किंवा एनबीएफसीच्या विरोधात तक्रार करायची आहे, त्याचं नाव निवडावं लागेल. 
-यानंतर शेवटी युजर्सना आपल्या तक्रारीची माहिती टाकून सर्व काही तपासावे लागते.
-तक्रार करण्यास सांगितल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती भरल्यानंतर युजर्स ती सबमिट करू शकतात.
-यानंतर शेवटी युजर्सना आपल्या तक्रारीची माहिती टाकून सर्व काही तपासावे लागते.
-तक्रार करण्यास सांगितल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती भरल्यानंतर युजर्स ती सबमिट करू शकतात.


हे नक्की लक्षात ठेवा



वापरकर्ते आयबीआय लोकपालांकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या अडकलेल्या पैशांसह नुकसान भरपाईची मागणी करू शकतात. रिझर्व्ह बँकेचे लोकपाल पुढील दोन आठवड्यांत वापरकर्त्याने केलेल्या तक्रारीची छाननी करतात आणि त्यानंतर प्रकरण सोडवतात. तथापि, वापरकर्त्यांना आरबीआयकडे तक्रार करण्यापूर्वी त्यांच्या बँक किंवा संबंधित एनबीएफसीकडे तक्रार दाखल करावी लागेल. लेखी तक्रार करूनही युजर्सची समस्या सुटली नाही तर ते आरबीआयकडे तक्रार दाखल करू शकतात.


इतर महत्वाची बातमी-


Google Business Profile Websites:  गुगल देणार कोट्यवधी युजर्सना धक्का! लवकरच बंद होणार 'या' वेबसाईट्स