Honor Magic V2 : Honor ने आपला नवा फोन Honor Magic V2 (Smartphone)  लाँच केला आहे. Honor Magic V2 हा फोल्डेबल स्मार्टफोन आहे. Honor Magic V2 हा जगातील आतापर्यंतचा सर्वात स्लीम फोल्डेबल स्मार्टफोन आहे. Honor Magic V2 फक्त 9.9 मिमी स्लीम आहे आणि फोल्ड न करता 4.7 मिमी आहे. याचे एकूण वजन 231ग्रॅम आहे.Honor Magic V2 मध्ये7.92  इंचाची फोल्डेबल OLED स्क्रिन देण्यात आली आहे. यापूर्वी Xiaomi Mix Fold 2 हा सर्वात पातळ फोन असल्याचा दावा करण्यात आला होता, जो केवळ 11.2 मिमी आहे. याचे वजन 262 ग्रॅम आहे.


Honor Magic V2 फोनमध्ये फिचर्स कोणते?


Magic V2 मध्ये 7.92 इंचाचा LTPO OLED प्रायमरी डिस्प्ले आहे जो 2156x2344 पिक्सल रिझोल्यूशन ऑफर करतो. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz  आहे आणि HDR 10+ सपोर्ट करतो. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1,600 निट्स आहे. यात 120 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह 6.43 इंचाची कव्हर स्क्रीन देण्यात आली आहे. दुसऱ्या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 2,500 निट्स आहे. Magic V2 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर सह 12 जीबी पर्यंत रॅम आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेज आहे. ऑनर मॅजिक व्ही 2 ची अल्ट्राम एडिशन देखील आहे ज्यासह 16 जीबी पर्यंत रॅम आणि 1 टीबीपर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे.


Honor Magic V2 फोनमध्ये कॅमेरा कसा आहे?


कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर Honor Magic V2  मध्ये 50मेगापिक्सेलच्या प्रायमरी लेन्ससह 3 रियर कॅमेरे आहेत, ज्याचा अपर्चर एफ/1.9 आहे. यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन मिळते. दुसरा लेन्स 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि तिसरा लेन्स 20 मेगापिक्सलचा आहे. 


कधी पासून सुरु होणार विक्री?
 


Honor Magic V2   android 13-आधारितMagicOS 7.2 वर चालतो. फोनमध्ये 66 वॉट चार्जिंगसह 5000mAh ची सिलिकॉन कार्बन बॅटरी आहे. Magic V2ब्लॅक, सिल्क ब्लॅक, सिल्क पर्पल आणि गोल्ड रंगात उपलब्ध आहे. Honor Magic V2 ची सुरुवातीची किंमत 8,999 चीनी युआन म्हणजेच जवळपास 1,03,033 रुपये आहे. या फोनची विक्री चीनमध्ये 20 जुलैपासून सुरू होणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


How to Transfer E-Sim: फक्त iPhone नाही तर आता Android युजर्सही ट्रान्सफर करू शकतात E-SIM, जाणून घ्या कसे?


How to Transfer E-Sim: फक्त iPhone नाही तर आता Android युजर्सही ट्रान्सफर करू शकतात E-SIM, जाणून घ्या कसे?