मुंबई : तुमच्याकडेही अँड्रॉइड (Android) फोन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अँड्रॉईड फोन युजर्सवर नेहमीच हॅकर्सचे संकट असते. अँड्रॉईड युजर्स नेहमीच हॅकर्स (Hackers) लक्ष्य असतात. काही मालवेअर ॲप्स तुमच्या सुरक्षेसाठी धोका आहे. काही दिवसांपूर्वीच एका सिक्युरिटी फर्मने आपल्या रिपोर्टमध्ये अशा 13 मोबाईल ॲप्सची माहिती दिली होती. हे मालवेअर ॲप्स अँड्रॉइड यूजर्ससाठी खूप धोकादायक आहेत. या सर्व ॲप्समध्ये Xamalicious नावाचा मालवेअर आहे जो तुमच्या फोनवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकतो. चला जाणून घेऊया या ॲप्सबद्दल...
हा मालवेअर काय करू शकतो?
Xamalicious या मालवेअरच्या मदतीने हॅकर्सला तुमच्या स्मार्टफोनवर नियंत्रण मिळवता येते. या मालवेअरच्या मदतीने तुमची हेरगिरी केली जाऊ शकते. इतकंच नाही तर, तुमची फसवणूकही केली जाऊ शकते. तुमच्या स्मार्टफोनमधील वैयक्तिक माहितीची वापर करुन तुमच्या बँक खात्यांतील पैसे गायम करत, तुमचं खातं रिकामी केलं जाऊ शकतात. तुमचा फोन हॅकर्सकडून नियंत्रित केला जाऊ शकतो. यामुळे, हे सर्व मालवेअर ॲप्स तुम्ही तुमच्या फोनमधून ताबडतोब डिलीट करा आणि ते ॲप्स पुन्हा डाउनलोड करण्याची चूक करू नका, अजिबात करु नका. या धोकादायक ॲप्सची नावे कोणती आहेत, ते जाणून घ्या.
Xamalicious मालवेअर ॲप्सची नावे
- Essential Horoscope for Android (com.anomenforyou.essentialhoroscope)
- 3D Skin Editor for PE Minecraft (com.littleray.skineditorforpeminecraft)
- Logo Maker Pro (com.vyblystudio.dotslinkpuzzles)
- Auto Click Repeater (com.autoclickrepeater.free)
- Count Easy Calorie Calculator (com.lakhinstudio.counteasycaloriecalculator)
- Sound Volume Extender (com.muranogames.easyworkoutsathome)
- LetterLink (com.regaliusgames.llinkgame)
- Numerology : Personal horoscope & number predictions (com.Ushak.NPHOROSCOPENUMBER)
- Step Keeper : Easy Pedometer (com.browgames.stepkeepereasymeter)
- Track Your Sleep (com.shvetsStudio.trackYourSleep)
- Sound Volume Booster (com.devapps.soundvolumebooster)
- Astrological Navigator : Daily Horoscope & Tarot (com.Osinko.HoroscopeTaro)
- Universal Calculator (com.Potap64.universalcalculator)
दरम्यान, भारत सरकार आणि गुगल प्लेनेही मालवेअर अॅप्सवर बंदी घातली आहे. याआधी गुगल प्ले स्टोअरने एक धोकादायक अँड्रॉइड अॅप ब्लॉक केले आहेत, जे गुप्तपणे युजर्सचा फेसबुक डेटा चोरत आहे.
कोणतेही ॲप्स डाऊनलोड करताना युजर्सने कोणती काळजी घ्यावी?
- तुम्हीही फोनमध्ये हे अॅप डाऊनलोड केले असतील तर लगेच डिलीट करा.
- प्ले स्टोअरवरून कोणतेही अॅप डाऊनलोड करत असताना त्याचे रिव्ह्यू नक्की वाचा.
- तुमचे Facebook किंवा बँक खाते तपशील कोणत्याही अनधिकृत अॅपसोबत शेअर करू नका.