Gadget Charging Device : एका 19 वर्षाच्या तरूणानं मानवी शरीरातील एनर्जीवर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स चार्ज (Gadget Charging Device) करता येतील, अशा हँडएनर्जी डिव्हाईचा (Hand Energy Charging) शोध लावला आहे. या डिव्हाइसची निर्मिती करणाऱ्या तरूणाचं नाव मायकल वागा आहे. यासाठी त्याच्या सहकाऱ्यांनीदेखील मदत केली आहे. या डिव्हाईसच्या मदतीनं आता मानवी शरीरातील एनर्जीचा उपयोग करून तुमचा मोबाईल चार्ज करता येणार आहे. या हँडएनर्जी डिव्हाईसच्या युजर्सना आपला हात फिरवून मोबाईलची बॅटरी चार्ज करता येणार आहेत. हे डिव्हाइस मोशन डिव्हाइसला जाइरोस्कोप उपकरणाला एनर्जी उत्पन्न करण्यासाठी सक्रिय करते. यामुळे एनर्जीला स्टोअर केली जाऊ शकते आणि मोबाईलही लवकर चार्ज करता येणार आहे. या डिव्हाइसला किकस्टार्टरमध्ये 50,872  युरोपेक्षा जास्त निधी जमा झाला आहे. 


हे डिव्हाईस कसं करतं काम?


हँडएनर्जी डिव्हाइसची निर्मिती करणाऱ्या मायकल वागानं सांगितल्यानुसार, 'तुम्ही जसं जसं हात फिरवाल तसं तसं रोटरची स्पीड वाढते आणि जास्तीत जास्त पॉवर जनरेट होते. या रोटरची  5,000 rpm इतकी स्पीड आहे. तु्मच्या जनरेट करण्यात आलेल्या यांत्रिक ऊर्जेला विद्युत ऊर्जेत परावर्तीत करते. यामुळे तुमच्या डिव्हाइस चार्ज करता येणार आहे.  त्याने पुढे सांगितले की, हे प्रॉडक्ट डेव्हलप करण्यासाठी 1 वर्षापेक्षा जास्त वेळ लागला आहे. नेहमी प्रवास करताना ज्यांना गॅझेट चार्जिंग करण्याची अडचण आहे अशा लोकांना या डिव्हाइसचा फायदा होणार आहे. 


इतका वेळ लागतो चार्जिंगला


हँडएनर्जी डिव्हाइसच्या बॅटरीला 100 टक्के चार्जिंग करण्यासाठी  40 मिनिटापासून ते  1 तासापर्यंतचा वेळ लागतो. यासोबत तुमचा मोबाईल चार्ज करायचा असेल, तर त्याची स्पीड 30 टक्क्यांनी कमी होते. 


19 वर्षीय वागानं काय सांगितलं?
  


मायकल वागा आणि त्याच्या टीमच्या म्हणणं आहे की, हे हँडएनर्जी डिव्हाइस तु्म्ही सहज फैरफटका मारत एमर्जन्सीच्या वेळी पावर जनरेट करण्यासाठी खूपच उपयोगी आहे. हे कोणतंही इंधन न जाळता  ग्रीन एनर्जीची निर्मिती करते. या डिव्हाइसच्या युजर्स मोबाईल अॅपच्या मदतीनं यामध्ये किती टक्के एनर्जी जनरेट  झाली आहे, हे पाहू शकतात.  पुढे मायकल वागानं सांगितले की, 'जेव्हा एका उपक्रमाला अनेक वर्षांत तयार करण्यात येतं, हे फक्त उपयोगीच नाही, तर याची खूप आवश्यकतासुद्धा होती. हा माझ्यासाठी सर्वोत्तम साक्षात्कार आहे.


या डिव्हाईसची इतकी असेल किमत?


या उपक्रमाचे लोकांनी खूप कौतुक केलं आहे आणि अनेक लोक तर यामुळे आनंदी होते की, या डिव्हाइसमुळे त्यांची वीज टंचाईपासून सुटका हाईल. तसेच या डिव्हाइसवर लोकांच्या सर्व प्रतिक्रिया खूपच चांगल्या आहेत. हे हँडएनर्जी डिव्हाइस मार्च 2024 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या डिव्हाइसची रिटेल किमत अंदाजे 84 युरो असू शकते.



वाचा इतर बातम्या :