मुंबई : सध्या डीजिट युगामुळे जगं जितकं सोपं झालं आहे, तितक्याच डिजिटल अडणींचा सामना देखील करावा लागतो. ऑनलाइन वापरकर्त्यांची सर्वात मोठी अडचण आणि समस्या म्हणजे सायबर गुन्ह्यांपासून (Cyber Crime) सुरक्षित राहणे. सायबर गुन्हेगार दररोज इंटरनेट (Internet) वापरकर्त्यांचा डेटा हॅक करण्याचे अनेक मार्ग शोधत असतात. सध्या सायबर गुन्हेगारांना एक अशी पद्धत सापडली आहे, ज्या पद्धतीच्या मदतीने ते कोणत्याही वापरकर्त्याच्या Google खाते पासवर्डशिवाय सहज हॅक करु शकतात. त्यामुळे आता युजर्सनी जरी Google खात्याचा पासवर्ड रिसेट केला तरीही हॅकर्स युजर्सचे Google चे अकाऊंट हॅक करु शकतात. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
कसं कोणाचंही गुगल अकाऊंट वापरता येणार?
कोणत्याही वापरकर्त्यासाठी हा एक मोठा धोका आहे, कारण आजच्या आधुनिक युगात, बहुतेक लोक त्यांचा सर्व वैयक्तिक डेटा आणि पासवर्ड त्यांच्या Google खात्यात सेव्ह करतात. अशा परिस्थितीत हॅकर्सने पासवर्डशिवाय लोकांचे Google खाते वापरण्यास सुरुवात केली, तर संपूर्ण जगाची गोपनीयता धोक्यात येऊ शकते. द इंडिपेंडंटने दिलेल्या वृत्तानुसार, सिक्युरिटी फर्म क्लाउडसेकने सायबर गुन्ह्याच्या या नवीन पद्धतीचे विश्लेषण केले आहे. शिवाय, ऑक्टोबर 2023 मध्ये एका हॅकरने टेलिग्राम चॅनेलवर याबद्दल पोस्ट केल्यावर ही समस्या पहिल्यांदा समोर आली.
द इंडिपेंडंटच्या एका रिपोर्टमध्ये हे सांगण्यात आले आहे की, थर्ड पार्टी कुकीजमधील त्रुटींमुळे हॅकर्स युजर्सच्या गुगल अकाउंटमध्ये कसे प्रवेश करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की वेबसाइट्स आणि ब्राउझरद्वारे थर्ड पार्टी कुकीज वापरकर्त्यांना ट्रॅक करण्यासाठी आणि त्यांच्या गरजेनुसार जाहिराती दाखवण्यासाठी वापरल्या जातात, परंतु आता या थर्ड पार्टी कुकीज वापरकर्त्यांसाठी धोकादायक बनत आहेत.
गुगलने काय म्हटलं?
याशिवाय, गुगल कुकीजच्या मदतीने यूजर्सचे पासवर्ड सेव्ह करते जेणेकरून त्यांना पुढच्या वेळी लॉगिन करताना पासवर्ड टाकण्याची गरज पडू नये. पण हॅकर्सना टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन बायपास करण्याचा मार्ग सापडला आहे. CloudSEK च्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की, सायबर गुन्ह्याच्या या नवीन पद्धतीमुळे, हॅकर्स Google खात्याचा पासवर्ड रीसेट केल्यानंतरही वापरकर्त्यांचे Google खाते वापरू शकतील. हा अहवाल सायबर जगतात येणारा मोठा धोका आणि गुगलच्या तांत्रिक कमकुवतपणाबद्दल सतर्क करणारा आहे.