Social Media Use for Children नवी दिल्ली : आजकाल स्मार्ट फोनचा वापर सर्वांकडून केला जात आहे. लहान मुलांना देखील स्मार्ट फोन सहजपणे उपलब्ध होतो. सध्या ज्येष्ठ नागरिक, तरुण देखील सोशल मीडियावर सक्रीय असतात. सोशल मीडियाचे जसे काही फायदे आहेत तसे काही तोटे देखील असतात. आता 18 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खातं उघडण्यासाठी आई वडिलांची परवानगी घ्यावी लागेल. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून वैयक्तिक डिजीटल डेटा संरक्षण अधिनियम नियमांचा मसूदा तयार केला आहे. या संदर्भात 18 फेब्रुवारीपर्यंत सूचना किंवा आक्षेप नोंदवावे लागणार आहेत. ज्या प्रकारचे आक्षेप असतील त्यावर चर्चा केली जाईल. आक्षेप न आल्यास मसुदा मजूर केला जाईल.
वैयक्तिक डिजिटल डेटा संरक्षण नियमांची दीर्घ काळापासून प्रतीक्षा केली जात होती. सरकारनं आता जो मसूदा तयार केला आहे, त्यात नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईचा उल्लेख नाही. मात्र, सरकारनं नियम जारी करण्यासंदर्भात लोकांकडून अभिप्राय मागवले आहेत. यावर लोकांना 18 फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि आक्षेप नोंदवता येतील. 18 फेब्रुवारीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. लोकांच्या सूचनांचा आणि मतांचा विचार केला जाईल. नियम मान्य न करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.
250 कोटींच्या दंडाची तरतूद
या अधिसूचनेतील माहितीनुसार वैयक्तिक डिजिटल डेटा संरक्षण अधिनियम-2023 च्या कलम 40 च्या उपकलम (1) आणि (2) द्वारे प्राप्त मिळालेल्या शक्तींचा वापर कत केंद्र सरकार अधिनियम लागू झाल्यानंतर किंवा त्यानंतर तयार करण्यात येणाऱ्या नियमांचा प्रस्ताव लोकांच्या अभिप्रायासाठी जारी करण्यात आला आहे. या मसुद्यातील नियमांवर 18 फेब्रुवारी 2025 नंतर विचार केला जाईल. डेटा संदर्भातील विश्वासाचा भंग झाल्यास 250 कोटी रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. ज्या कारणासाठी आणि जितक्या वेळासाठी डेटा वापरण्यास परवानगी दिली असेल तितकाच वापर करण्यात यावा, असा देखील नियम असणार आहे.
इतर बातम्या :