Google Safe Internet Search : डिजिटल युगात गुगल (Google) आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे. शिक्षण (Education), नोकरी (Job), बिझनेस (Business), खरेदी (Shopping) किंवा मनोरंजन (Entertainment) अशा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लोक गुगलवर शोधतात. मात्र गुगलवर सर्व काही सर्च करणे सुरक्षित नसते (Unsafe Search on Google). काही कीवर्ड (Keywords) किंवा टॉपिक्स (Topics) सर्च केल्यास तुम्ही थेट कायदेशीर अडचणीत (Legal Trouble) सापडू शकता आणि पोलीस (Police) तुमच्या दारातही पोहोचू शकतात.
Google Search History : गुगल सर्च हिस्ट्रीवर लक्ष
गुगल तुमच्या प्रत्येक सर्च क्वेरीचा (Search Query) डेटा जतन करते. गरज पडल्यास सायबर सेल (Cyber Cell) आणि तपास यंत्रणा (Investigation Agencies) हा डेटा तपासू शकतात. त्यामुळे जर तुम्ही चुकीचा किंवा संशयास्पद शब्द सर्च केला, तर तो तुमच्याविरुद्ध पुरावा (Evidence) ठरू शकतो. आयटी, सायबर कायद्याखाली अशा प्रकरणी कारवाई होऊ शकते.
कोणते सर्च टाळावेत?
1. हत्यारं (Weapons) किंवा बॉम्ब (Bomb Making) तयार करण्याचे मार्ग सर्च करणे. हा गंभीर गुन्हा (Serious Crime) आहे.
2. ड्रग्स (Drugs) संबंधी माहिती सर्च करणे. यामुळे कायद्याने कडक कारवाई होते.
3. बाल अश्लील साहित्य (Child Pornography) किंवा प्रतिबंधित कंटेंट- शिक्षा आणि दंड (Penalty).
4. कोणत्याही धर्म (Religion), व्यक्ती (Person) किंवा संस्थेविरुद्ध (Organization) अपमानास्पद सर्च – गुन्हा सायबर क्राईम (Cyber Crime) मध्ये मोडतो.
5. बँकिंग फ्रॉड (Banking Fraud), बनावट नोटा (Fake Currency) किंवा हॅकिंग ट्रिक्स (Hacking Tricks) सर्च करणे – त्वरित पोलीस कारवाई होऊ शकते.
काय होऊ शकते?
अनेक वेळा फक्त कुतूहलातून (Curiosity) सर्च केल्यानंतरसुद्धा लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची उदाहरणं आहेत. अशा प्रकरणांमध्ये गुगल आणि सोशल मीडिया अशा दोन्ही ठिकाणी तुमची हिस्ट्री (History) तपासली जाते. त्या आधारे पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार आहे.
सुरक्षित इंटरनेट वापर (Safe Internet Use)
लक्षात ठेवा, गुगल हा मित्र आहे, पण कायद्यापेक्षा वर नाही. त्यामुळे इंटरनेट वापरताना (Internet Use) नेहमी सावध राहा. फक्त माहिती, शिक्षण आणि ज्ञानासाठी गुगलचा वापर करा. चुकीच्या सर्चमुळे तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन मोठी अडचण निर्माण होऊ शकते.
ही बातमी वाचा: