Google Podcast Service : ऑफिसपासून ते कामाच्या संदर्भात महत्त्वाचा डेटा साठविण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत आपण गुगलचा (Google) वापर करतो. याच गुगलच्या सेवेच्या माध्यमातून आपली अनेक कामे सहज शक्य होतात. अशातच आजपासून म्हणजेच (2 एप्रिल) कंपनी आपली एक महत्त्वाची सेवा बंद करणार आहे. तुम्हीही या सेवेचा लाभ घेत असाल तर तुमचा जो काही डेटा आहे तो तात्काळ सेव्ह (Save) करायला घ्या. अन्यथा तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स डिलीट होतील. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, गुगलची नेमकी कोणती सेवा बंद होणार आहे? तर, तुमच्या माहितीसाठी गुगलने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच आपली पॉडकास्ट सेवा बंद करण्याची घोषणा केली होती. आज या मुदतीचा शेवटचा दिवस आहे. 


ताबडतोब यूट्यूब म्युझिकमध्ये ट्रान्सफर करा


याबाबत गुगलने सांगितले होते की, जर तुम्ही पॉडकास्ट वापरत असाल आणि तुमच्या पॉडकास्टमध्ये महत्त्वाचा डेटा असेल तर तुम्ही तो ताबडतोब यूट्यूब म्युझिकमध्ये ट्रान्सफर करा. त्याचे यूजर्स जुलै 2024 पर्यंत सदस्यत्व ट्रान्सफर करू शकतील. तुम्ही डेटा ट्रान्सफर केल्यास, काही वेळ लागू शकतो. यावेळी तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की सर्व पॉडकास्ट YouTube Music वर हस्तांतरित होणार नाहीत. जे पॉडकास्ट ट्रान्सफर केले जाऊ शकत नाहीत, त्यावर तुम्हाला Content is Unavailable असे लिहिलेले दिसेल. 


गुगलने हळूहळू पॉडकास्टचे फीचर्स यूट्यूब म्युझिकसह इंटीग्रेट करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत यूट्यूब म्युझिक आणि पॉडकास्ट एकाच ॲपमध्ये दिसू लागले आहेत. लवकरच इतर देशांमध्ये सुद्धा ही सेवा पुरवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Google Podcast चा वापर जगभरात 50 कोटींहून अधिक लोकांनी केला आहे. हे अॅप यूजर्सने डाऊनलोड केलं आहे. खरंतर, पॉडकास्टचे फीचर Google YouTube Music मध्ये देखील जोडले जात आहे, ज्यामध्ये RSS फीड देखील समाविष्ट आहे. 


डेटा कसा ट्रान्सफर करायचा?



  • यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल पॉडकास्ट ॲपला भेट द्यावी लागेल.

  • या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनच्या टॉपला एक्सपोर्ट सबस्क्रिप्शन (Export Subscription) हा पर्याय दिसेल तो तुम्हाला निवडायचा आहे.  

  • यानंतर, तुम्हाला एक्सपोर्ट टू यूट्यूब म्युझिकचा (Export To YouTube Music) असा ऑप्शन दिसेल. 

  • यानंतर तुम्हाला Export हा पर्याय निवडायचा आहे आणि तो सुरु ठेवायचा आहे. 

  • तुम्हाला सबस्क्रिप्शन पाहायचं असल्यास, तुम्हाला ते Go To Library सापडेल. 


महत्त्वाच्या बातम्या :


Smartphone : फोनवरून महत्त्वाचे फोटो डिलीट झालेत? काळजी करू नका; 'या' 3 पद्धतींनी काही क्षणात फोटोंचा बॅकअप मिळणार