Google Pixel 7a Launch: गुगल अखेर आपला बहुप्रतिक्षित Google Pixel 7a फोन 10 मे 2023 रोजी होणाऱ्या Google IO 2023 इव्हेंटमध्ये लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन लॉन्च होण्यापूर्वी, टिपस्टर देवानंद रॉय यांनी ट्विटरवर मोबाईल फोनचे फीचर्स शेअर केले आहेत. देवानंद रॉय अनेकदा आगामी फोनचे स्पेसिफिकेशन आणि किंमती शेअर करतो. या अपकमिंग फोनमध्ये कंपनी कोणते नवीन फीचर्स देऊ शकते, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...


अपेक्षित फीचर्स 


Tipster नुसार, Google Pixel 7a ला 6.1 FHD प्लस OLED डिस्प्ले मिळेल, जो 90hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. मोबाईल फोन Google Tensor G2 चिपसेटसह येईल. Google Pixel 7a मध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यामध्ये 64 मेगापिक्सेल Sony imx787 सेन्सर आणि दुसरा 12 मेगापिक्सेल कॅमेरा असू शकतो. समोर 10.8 मेगापिक्सेल लेन्स असेल. मोबाईल फोन Android 13 वर काम करेल, तसेच त्याला 5W वायरलेस चार्जिंग मिळेल.


Google Pixel 7 Pro


तुम्ही Google Pixel 7 Pro ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून 76,990 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्हाला स्मार्टफोनवर 18,050 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. ज्या अंतर्गत तुम्ही फोन स्वस्तात खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला 6.7 इंच डिस्प्ले, 5000 mAh बॅटरी, 50MP + 48MP + 12MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि समोर 10.8MP फ्रंट कॅमेरा मिळेल.






Google IO 2023 इव्हेंट


या वर्षी Google IO 2023 इव्हेंट 10 मे 2023 रोजी Google च्या मुख्य कार्यालयासमोर असलेल्या Shoreline Amphitheater, Mountain View, California येथे आयोजित केला जाईल. तुम्ही इव्हेंट ऑनलाइन देखील पाहू शकता. या इव्हेंटमध्ये तुम्हाला Android 14 बीटाची पहिली झलक पाहायला मिळेल. यासोबतच कंपनी बार्ड चॅटबॉट अधिकृतपणे लॉन्च  करू शकते. 


14 मार्च रोजी पोको लॉन्च करणार बजेट स्मार्टफोन 


Poco 14 मार्च रोजी भारतात Poco x5 5G मोबाईल फोन लॉन्च करेल. याची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत बाजारात येऊ शकतो. यामध्ये तुम्हाला Snapdragon 695 SoC आणि 5000 mAh बॅटरी मिळेल. मोबाईल फोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यामध्ये 48-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2-मेगापिक्सेलचा मायक्रो कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.