Google Pay Electricity Bill : सध्या सगळीकडेच ऑनलाईन पेमेंट (Online Payment) केलं जातं. त्यात अनेक ऑफिस, रेल्वे स्टेशन (Railway Station), मेट्रो स्टेशन असो किंवा साधं भाजीचं दुकान असो सगळीकडे ऑनलाईन पेमेंट केलं जातं. त्यात आता थेट आपण सगळे बिल्स ऑनलाईन भरु शकतो. अनेक लोक पेटीएम (Paytm) किंवा बाकी कोणते अॅप्स (Electricity Bill) वापरुन पेमेंट करत असतात मात्र गुगल पेतर्फे ऑनलाइन वीजबिल भरण्याची सेवा दिली जाते. म्हणजेच आता वीज बिल भरण्यासाठी इतर कोणत्याही पोर्टल किंवा पॉवर हाऊसमध्ये जाण्याची गरज नाही. गुगल पे अॅपच्या मदतीने वीज ग्राहकांना ऑनलाइन वीजबिल भरता येणार आहे. यासाठी गुगल पेने अनेक राज्यांच्या वीज वितरणाशी आणि राज्य सरकारशी भागीदारी केली आहे, ज्यामुळे देशात ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढू शकते.



गुगलने नुकतीच ही सेवा तेलंगणा राज्यातील युजर्ससाठी सुरू केली आहे. त्यासाठी नॉर्दन पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी ऑफ तेलंगणा लिमिटेड (TSNPDCL) आणि तेलंगणा स्टेट सदर्न पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड यांच्याशी भागीदारी करण्यात आली आहे. भारतात डिजिटल सेवा झपाट्याने वाढत आहे. अशावेळी गुगलकडून एक नवीन पेमेंट सर्व्हिस दिली जाते. गुगल पेद्वारे डीटीएच, इंटरनेट, गॅस, फास्टॅग, प्ले रिचार्ज सह वीज बिल भरता येणार आहे. ही इन-अॅप सेवा असणार आहे.


गुगल पेने वीज बिल कसे भरावे


-सर्वप्रथम गुगल पे ओपन करा. यानंतर पे बिलचा पर्याय निवडावा लागेल.
-यानंतर पेमेंट ऑप्शनमधून वीज श्रेणी निवडावी लागेल.
-त्यानंतर आपल्याला टीएसएनपीडीसीएल किंवा टीएसएसपीडीसीएलकडून एक वीज बिल निवडावे लागेल. -त्यानंतर तुम्हाला योग्य एजन्सी निवडावी लागेल.
-यानंतर तुम्हाला कन्झ्युमर अकाऊंट लिंक करावं लागेल.
-त्यानंतर बिलाची रक्कम भरावी लागते. यानंतर पेमेंटसाठी यूपीआय पिन टाकावा लागेल.
-महत्वाची गोष्ट म्हणजे वापरकर्ते त्यांच्या राज्यातील वीज वितरण निवडून ऑनलाइन पेमेंट करू शकतात.


पेमेंट करताना काळजी घ्या


गुगल पे (Google Pay) ॲपद्वारे तुम्हाला कुठेही आणि कधीही सहज पेमेंट करण्यात मदत होते. भारतात ऑनलाईन पेमेंट वाढल्याने गुगल कंपनी गुगल पे ॲपमध्ये सुरक्षिततेची खास काळजी घेते. यासाठी कंपनी सर्वोत्तम Artificial intelligence)म्हणजे एआय टेक्नॉलॉजी (AI Technology) याचा वापर करते.गुगल कंपनीने म्हटलं आहे की, आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी सतत आणि सक्रियपणे काम करत आहोत, पण गुगल पेवर ऑनलाईन पेमेंट करताना तुम्ही देखील काळजी घेणं आवश्यक आहे.


इतर महत्वाची बातमी-


Google Business Profile Websites:  गुगल देणार कोट्यवधी युजर्सना धक्का! लवकरच बंद होणार 'या' वेबसाईट्स