BlueSky : ट्विटरच्या धोरणांना वैतागलेल्यांसाठी आता एक खुशखबर आहे. ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी ट्विटरला पर्याय म्हणून ब्लूस्काय (BlueSky) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. हे नवीन फीचर लवकरच सर्वांसाठी खुलं होणार असून त्याची सध्या बिटा टेस्टिंग सुरू आहे. 


गेल्या अनेक वर्षापासून लोकांमध्ये मायक्रो-ब्लॉगिग प्लॅटफॉर्म म्हणून ट्विटरची लोकप्रियता प्रचंड होती. परंतु आता अनेक लोक ट्विटरमुळे त्रस्त असल्याचं दिसून येतं आहे. त्यामुळे दिवसेंदिवस ट्विटरची लोकप्रियता कमी होत आहे. यासाठी ट्विटरचे नवीन मालक इलॉन मस्क कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. कारण जेव्हापासून मस्क यांनी ट्विटरची मालकी मिळविली आहे, तेव्हापासून ट्विटरमधील कर्मचारी असो किंवा यूजर्सना मिळणारा अनुभव असो या दोघांनाही मोठा मनस्ताप सोसावा लागतोय. त्यामुळे साहजिकच यूजर्सही नवीन ट्विटर हॅंडलच्या प्रतिक्षेत होते. कारण एखादे प्लॅटफॉर्म यूजर्सच्या गरजा पूर्ण करण्यात कमी पडत असेल, तर साहजिकच त्याला पर्याय शोधला जातो. असंच काहीसं ट्विटरच्या बाबतीत होताना दिसून येत आहे. कारण आता मस्कच्या ट्विटरला टक्कर देण्यासाठी ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी (CEO Jack Dorsey) यांच्याकडून ब्लू स्काय (BlueSky) लाँच करण्याच्या तयारीत आहेत. ब्लूस्काय हे नवीन मायक्रो-ब्लॉगिंग साईट असणार आहे.


आता ट्विटरला नवीन पर्याय BlueSky


ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी ब्लूस्काय नावाचं नवीन ट्विटर हॅंडल लाँच केलं आहे. युजर इंटरफेसच्या बाबतीत ब्लूस्काय बऱ्यापैकी ट्विटरसारखं असणार आहे. ब्लूस्कायला मायक्रो-ब्लॉगिंग साईटने 'Twitter-2'असं नावही दिलं आहे. मूळात BlueSky चा एकमेव उद्देश, 'सध्या जे यूजर्स ट्विटरच्या नवीन बदलेल्या धोरणांवर नाराज आहेत, अशा यूजर्सना ब्लूस्काय या आपल्या प्लॅटफाॅर्मला जोडून घेणार आहे.' पण अजूनही सर्व युजर्ससाठी ब्लूस्काय उपलब्ध होऊ शकलं नाही. याचं कारण या मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफाॅर्ममध्ये अजून बऱ्याच कमतरता आहेत. त्या दूर करण्यासाठी काम केलं जातं आहे. सध्या हे प्लॅटफाॅर्म  बीटा-टेस्टिंगमध्ये असल्यामुळे फक्त एका इन्विटेशन कोडच्या माध्यमातूच अॅक्सेस केलं जाऊ शकत. कोणतंही प्लॅटफाॅर्म  सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देण्याआधी ते सुरूवातीला बीटा-टेस्टिंगमध्ये असतं. अशावेळी काही मोजक्या लोकांसाठी हे प्लॅटफाॅर्म  उपलब्ध असतं. पण या नवीन प्लॅटफार्मची लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असल्याचं दिसून येत आहे.


BlueSky बद्दल लोकांच्या  मनात प्रचंड उत्सुकता 


सध्या तरी ब्लूस्काय सर्व लोकांसाठी उपलब्ध नाही. पण या प्लॅटफाॅर्मच्या वेटिंग लिस्टमध्ये 10 लाख लोक आल्याचं म्हटलं जातं आहे. ही वेटिंग लिस्ट पाहूनच अंदाज लावू शकतो की, अनेक लोक ट्विटरमुळे त्रस्त असल्याचं दिसून येत आहे.  डाटा एआय (Data.ai) या वेबसाईटनुसार,  जगभरातील अॅपलच्या अॅपल प्ले स्टोरवरून BlueSky हे अॅप  3 लाख 60 हजार पेक्षाही जास्तवेळा डाऊनलोड केलं आहे. ब्लूस्काय हे नवीन प्लॅटफाॅर्म ट्विटरसारखं असणार आहे. पण सीईओ जॅक डोर्सी यांच्या म्हणण्यानुसार, 'आम्ही या प्लॅटफाॅर्मबाबत ओपन सोशल मीडिया इकोसिस्टीमसारख्या संकल्पनेतून पाहत आहोत. जे सर्वांसाठी खुलेपणानं अभिव्यक्त होण्यासाठी उपलब्ध असणार आहे.