Zomato AI : अन्न वितरण (Food Delivery App) अॅप Zomato ने 'Zomato AI' सादर केले आहे. हा एक परस्परसंवादी चॅटबॉट आहे जो तुमचा फूड ऑर्डर करण्याचा अनुभव अधिक चांगला आणि सोयीचा बनविण्यासाठी तुम्हाला मदत करतो. एका ब्लॉगपोस्टमध्ये, कंपनीने या नवीन फीचरला सर्वात बुद्धिमान, सहज सोपा आणि परस्परसंवादी म्हटलं आहे. याचं कारण म्हणजे या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना कोणतं फूड ऑर्डर करावं हे निवडण्यासाठी AI फीचर त्यांना मदत करतील. इतकंच नाही तर, या फीचर्च्या माध्यमातून ग्राहकांची भूक, तुमचं डाएट इतकंच नव्हे तर तुमचा मूड पाहून कोणतं फूड तुमच्यासाठी चांगलं आहे हे निवडण्यास मदत करतात.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे 'Zomato AI' अॅपमध्येच इंटिग्रेटेड आहे. ते वापरण्यासाठी, तुम्हाला अॅपचे लेटेस्ट व्हर्जन इन्टॉल करावं लागेल. सध्या, हे वैशिष्ट्य झोमॅटो गोल्ड ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि ते त्याद्वारे अन्न ऑर्डर करण्यासाठी मदत घेऊ शकतात.
Zomato AI काय करू शकते?
Zomato AI सह, तुम्ही केवळ खाद्यपदार्थ ऑर्डर करू शकत नाही तर ज्याप्रकारे ग्राहक उच्च-प्रथिने, कमी-कार्ब आहाराचा आनंद घेऊ शकता अगदी त्याचप्रमाणे तुम्ही हवामान, मूड आणि आहारानुसार तुमच्यासाठी काय चांगले असेल हे देखील जाणून घेऊ शकता. याशिवाय, हँगओव्हर झाल्यास काय खावे आणि काय खाऊ नये हे देखील तुम्ही चॅटबॉटला विचारू शकता.
तुम्हाला अॅपमध्ये एक विजेट देखील मिळेल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व आवडत्या पदार्थांची सेवा करणाऱ्या रेस्टॉरंटची यादी मिळते. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ कमी वेळात ऑर्डर करू शकता. कोणते खाद्यपदार्थ ऑर्डर करावे हे समजत नसेल तर तुम्ही Zomato AI ची मदत घेऊ शकता.
अशा प्रकारे जे थे सुविधा महत्त्वाची आहे, Zomato AI एक मौल्यवान साधन म्हणून ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर आहे. जे तुमचा जेवणाचा अनुभव अधिक चांगला आणि सहज सोपा बनविण्यात तुमची मदत करतात. तुम्हाला सुद्धा Zomatoच्या या नवीन फीचरचा लाभ घ्यायचा असे आणि तुमच्या फूडचा आनंद घ्यायचा असेल. तर, तुम्ही झोमॅटोच्या फूडचं नवीन फीचर इन्स्टॉल करू शकता. आणि या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
WhatsApp New Feature : आता व्हॉट्सअॅपवर नंबर सेव्ह करणं होणार सोपं, जाणून घ्या स्टेप्स