Articles on X : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या नावाचा समावेश केला जातो. एलॉन मस्क हे एक्स (x) पूर्वीचे (ट्विटरवर) यूजर्ससाठी नेहमीच वेगवेगळे अपडेट घेऊन येत असतात. नुकतं एलॉन मस्क यांनी यूजर्सना एक्सचा अधिक चांगला लाभ घेण्यासाठी एक फीचर लॉन्च केलं आहे. या फीचरचं नाव आर्किकल फीचर आहे (Article Feature). या फीचरच्या माध्यमातून आता यूजर्सना एक्सवर (X) मोठमोठे लेख लिहीता येणार आहेत. तसेच, प्रीमियम X यूजर्सना प्लॅटफॉर्मवर स्टायलिश कंटेंट, फोटोज आणि व्हिडीओसह कंटेंट शेअर करता येणार आहे. 


या आर्टिकलमध्ये, यूजर्स कंटेंटसह फोटो, व्हिडीओ, पोस्ट, GIF आणि लिंक शेअर करू शकतील. याबरोबरच टेक्स्ट फॉरमॅटिंगसाठी यूजर्सना हेडिंग, सब-हेड, बोल्ड, इटॅलिक, बुलेट, नंबर आणि लिस्ट सारखे ऑप्शन्सही देण्यात आले आहेत. 


नवीन फीचर सादर करताना, कंपनीने एका निवेदनात असं म्हटलं आहे की, आर्टिकल हे X प्लॅटफॉर्मवर मोठ्या स्वरूपातील कंटेंट शेअर करण्याचा एक मार्ग आहे. एक्सवर या सगळ्या वैशिष्ट्यांसह लेख फक्त प्रीमियम प्लस सबस्क्रायबर्स आणि व्हेरिफाईड यूजर्सच पोस्ट करू शकतात. X चं हे फिचर जागतिक यूजर्ससाठी लॉन्च करण्यात आलं आहे.  


X वर आर्टिकल फीचर कसं वापराल?  


X वर आर्टिकल लिहिण्यासाठी यूजर्सना x.com ओपन करावं लागेल. येथे बाजूच्या मेनूमध्ये, तुम्हाला आर्टिकल टॅबमधील 'Write' ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.


आर्टिकल लिहून झाल्यानंतर तुम्हाला पब्लिश बटण दाबावं लागेल. यानंतर, हे आर्टिकल तुमच्या प्रोफाईलच्या आर्टिकल टॅबवर दिसेल.


X वर पब्लिश झालेल्या या आर्टिकलमध्ये यूजर्स बदलही करू शकतील. याबरोबरच यूजर्स त्यांना हवे असल्यास ते काढून टाकू शकतील.


X वर लवकरच आणखी काही बदल होतील


जेव्हापासून X ची कमान एलॉन मस्क यांच्या हाती आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते सतत बदल करत असतात. नुकत्याच झालेल्या एका कॉन्फरन्समध्ये त्यांनी X वरील आगामी बदलांबाबत संकेत दिले आहेत. त्यानुसार, लवकरच एक्सवर नवीन बदल दिसतील.  यूजर्सचा एक्स (X) वरचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी आम्ही यूजर्ससाठी हे बदल करत आहोत. यूजर्सना याचा नक्कीच चांगला फायदा होणार आहे असंही ते म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या :


Smartphone : मोबाईल स्क्रीनवर भरपूर जाहिराती दिसतायत? काळजी करू नका, 'या' छोट्या सेटिंगमुळे काम सोपं होईल