Artificial Intelligence : साधारण गेल्या काही महिन्यापासून चॅटजीपीटीशी संबंधित नवनवीन माहिती समोर येत आहेत. चॅटजीपीटीची (ChatGPT) निर्मिती करणाऱ्या एआयच्या कंपनीचे सीईओ सॅम अल्टमॅन (Sam Altman) यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेला (Artificial Intelligence) नियंत्रित करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे. सॅम अल्टमॅन यांनी अमेरिकन काँग्रेसला सांगितले की, "अत्यंत वेगाने वाढत जाणाऱ्या एआय सिस्टीममुळे निर्माण होणारे संभाव्य धोके कमी करण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप आवश्यक आहे." पुढे ते म्हणाले की, जसं जसं एआयचं तंत्रज्ञान प्रगत होत जाईल, तसं तसं जगाची चिंता वाढत जाईल. कारण कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे अनेक लोकांचं आयुष्य प्रभावित होऊ शकतं. त्यामुळे एआय तंत्रज्ञान नियंत्रित करण्यासाठी अल्टमॅन यांनी एक अमेरिकन किंवा ग्लोबल एजन्सीची निर्मिती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ही यंत्रणा जगातील सर्व शक्तिशाली एआय सिस्टीमला लायसन्स देईल." पुढे ते म्हणाले की, या एजन्सीला परवाना रद्द करण्याचाही अधिकार असावेत."
चॅटजीपीटीमुळे झाले अनेक बदल
ओपन एआयने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात चॅटजीपीटी लाँच केलं होतं. यानंतर चॅटजीपीटीकडे अनेक लोक आकर्षित झाली. हे ओपन एआय हे सर्वांसाठी खुल्लं असणारं चॅटबॉट टूल असून ते माणसाने विचारलेल्या प्रश्नांची बऱ्यापैकी अचूक उत्तरे देतो. तसेच, माणसाच्या आवाजात प्रतिक्रिया देऊ शकतो. यानंतर एआय चॅटबॉट विद्यार्थांचा गृहपाठ पूर्ण करतो. तसेच अनेकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, बेरोजगारी वाढू शकते आणि अनेक क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय लोकांमध्ये खोटी माहिती पसरवणे, लोकांना भ्रमित करणे इत्यादी. अशा चर्चा ऐकून लोकांमध्ये ChatGPT आणि कृत्रिम बुद्धीमत्तेवरुन (AI) लोकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
अल्टमॅन आणि इतर टेक कंपन्यांच्या सीईओंनी घेतली होती व्हाईट हाऊसमध्ये धाव
सध्या तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी परवाना देणाऱ्या कोणत्याही एजन्सीची स्थापना करण्यात आलेली नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्येच्या चिंतेमुळे सॅम अल्टमॅन आणि इतर टेक कंपन्यांच्या सीईओंनी काही दिवसांपूर्वी व्हाईट हाऊसमध्ये धाव घेतली होती. याठिकाणी टेक कंपन्यांच्या सीईओंकडून धोकादायक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या निर्मितीवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याशिवाय अल्टमॅन यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चुकीच्या कामासाठी वापर केला, तर खूप धोकादायक ठरु शकतं. असा इशाराही दिला होता.
हेही वाचा