Best Cars Under 20 Lakh :  जर तुम्ही वीस लाखांच्या बजेटमध्ये एखादी (Auto News) चांगली कार घेण्याचा विचार करत असाल तर आज आपण अशाच कारच्या बाबतीत माहिती करून घेणार आहोत. आज आपण काही कारचे ऑप्शन्स पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊया या कार विषयक फिचर्स...


टाटा हैरियर (Tata Harrier)



टाटा हैरियर कंपनीने 2023 मध्ये अपडेट केली होती. हिच एवरेज एक्स-शोरूम किंमत 15.49 लाख रुपयांपासून सुरू होऊन 26.44 लाख रुपयांपर्यंत आहे. हे 25 व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. तुम्ही हिला डिझेल इंजिनसह खरेदी करू शकता. ट्रान्समिशनच्या बाबतीत बोलायचं झाल्यास याच्यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक हे ऑप्शन मिळतात. सेफ्टीसाठी हिला भारत एनसीएपी (Bharat NCAP) कडून 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. सिटिंग कॅपॅसिटी च्या बाबतीत बोलायचं झाल्यास ही 5 सीटरची कार आहे. 


टाटा सफारी (Tata Safari)


टाटा सफारी ला कंपनीने गेल्या वर्षी अपडेट केलं होतं. याची एव्हरेज एक्स-शोरूम किंमत 16.19 लाख रुपयांपासून सुरू होऊन ती 27.34 लाख रुपयांपर्यंत जाते. ही 29 वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. तुम्ही हिला डिझेल इंजिन सहित खरेदी करू शकता. ट्रान्सलेशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर याच्यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक हे ऑप्शन मिळतात. हिला सुद्धा भारत एनसीईपी (Bharat NCAP) याच्याकडून सेफ्टीसाठी 5- स्टार रेटिंग मिळाले आहे. सिटिंग कॅपॅसिटीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास ही 6 आणि 7 सिटर या ऑप्शन मध्ये तुम्हाला मिळू शकते. 


टोयोटा इनोवा (Toyota Innova)


तुम्ही जर कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी टोयोटा इनोवा क्रिस्टा ही सुद्धा एक चांगला पर्याय ठरू शकते. हिची एव्हरेज एक्स-शोरूम किंमत 18.65 लाख पासून सुरू होऊन 19.99 लाख रुपयांपर्यंत जाते. ही 7 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. हिला ASEAN NCAP मार्फत 5-स्टार रेटिंग दिले आहे. सिटिंग कॅपॅसिटी च्या बाबतीत बोलायचं झाल्यास 7 आणि 8 सीटर चा ऑप्शन तुम्हाला यात मिळू शकतो.


एमजी हेक्टर प्लस (MG Hector Plus)



MG Hector Plus याची एव्हरेज एक्स-शोरूम किंमत 17.80 लाख पासून सुरू होऊन ती 22.98 लाख रुपयांपर्यंत जाते. ही 20 व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. हिच्या सीटिंग कॅपॅसिटी बद्दल बोलायचे झाले तर ही तुम्हाला सहा आणि सात सीटर या ऑप्शन मध्ये मिळू शकते. ही गाडी तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह उपलब्ध आहे. याच्या ट्रान्समिशन मध्ये तुम्हाला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक हे दोन ऑप्शन मिळतात.


इतर महत्वाची बातमी-


Maruti Suzuki : 'ही' आहे भारतात मिळणारी सर्वात स्वस्त कार; बेस मॉडेलची किंमत 4 लाखांहून कमी