मुंबई : इलॉन मस्क (Elon Musk) यांनी काही महिन्यांपूर्वी ट्वीटर (Twitter) ही कंपनी विकत घेतल्यानंतर आता याला X म्हणून ओळखले जाते. दरम्यान इलॉन मस्क यांना हे द एव्हरिथिंग अॅप सुरुवातीपासूनच बनवयाचे होते. त्या दृष्टीने त्यांनी पावलं देखील उचलण्यास सुरुवात केली होती. तसेच त्यांना एका अॅपद्वारे मनोरंजन, बातम्या, मेसेजिंग, पेमेंट इत्यादी सुविधा युजर्सना उपलब्ध करुन द्यायच्या आहेत. त्यासाठी ट्वीटरमध्ये सातत्याने नवे फिचर देखील जोडले जातायत. सध्या कंपनीने Android वापरकर्त्यांसाठी आणखी एक नवीन फीचर सुरु केल आहे. पण सध्या हे फिचर iOS युजर्ससाठी उपलब्ध नाही.


व्हॉट्सअॅप-इन्स्टाग्रामचं फिचर आता ट्वीटरवरही


ट्वीट करत या नव्या फिरचविषयी माहिती देण्यात आलीये. तसेच भारतीय युजर्सनी ट्वीटरवर यासंदर्भात पोस्ट देखील केलीये. या फिचरच्या मदतीने आता तुम्ही तुमच्या  प्रियजनांशी किंवा तुमच्या फॉलोअर्सशी समोरासमोर व्हिडिओ कॉलद्वारे कनेक्ट होऊ शकता. व्हॉट्सअॅप-इन्स्टाग्राममध्ये ज्याप्रमाणे व्हिडिओ कॉल फीचर काम करते, त्याचप्रमाणे हे फीचर एक्समध्येही काम करेल. म्हणजेच ते ऑपरेट करणे खूप सोपे आहे.






केवळ प्रीमियम युजर्सना घेता येणार आनंद 


केवळ X प्रीमियम युजर्स या नव्या ऑडिओ-व्हिडिओ कॉल फिचरचा वापर करु शकतील. फ्री युजर्सना हा पर्याय मिळणार नाही. तसेच कंपनीने याआधी देखील प्रीमियम युजर्ससाठी अनेक फिचर आणले आहेत. सध्या हे फिचर्स वापरण्यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागतात. त्यामुळे केवळ प्रीमियम आणि प्रीमियम प्लस युजर्ससाठी हे देखील फिचर उपलब्ध आहे की याबाबत अद्याप स्पष्टता देण्यात आली नाही. 


असं सुरु करा 'हे' फिचर


व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलचा पर्याय चालू करण्यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जावे लागेल. त्यानंतर प्रायव्हसी आणि सेफ्टी पर्याय निवडून डायरेक्ट मेसेजवर क्लिक करा. तिथे तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलचा पर्याय सुरू करावा लागेल. तुम्ही हे करताच, तुम्हाला चॅट्समध्ये हा पर्याय दिसू लागेल. यामुळे तुम्हाला तुमच्या फोलोअर्स आणि मित्र मैत्रिणींशी जोडण्यास मदत होणार आहे. 


हेही वाचा : 


Whatapp Update : दोन नंबरसाठी दोन whatsapp अॅपची गरज नाही; एकाच अॅपमध्ये वापरा दोन नंबर, कसं? ते पाहाच!