Asus ROG Phone 7 : Asus चा रिपब्लिक ऑफ गेमर्स (ROG) फोन गेमर्समध्ये खूप प्रसिद्ध आहेत. गेमर्सना Asus ROG हा खूपच आवडला आहे. अनेक लोक नेक्स्ट जनरेशन ROG फोनचीही आतुरतेने वाट पाहत आहेत. तुमचाही या लोकांमध्ये समावेश असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीच्या नेक्स्ट जनरेशन ROG फोनची तारीख जाहीर करण्यात आली आहे. Asus ने एका ट्विटमध्ये सांगितले आहे की ROG Phone 7 भारतात 13 एप्रिल रोजी लॉन्च होईल. हा फोन तैवान, जर्मनी आणि न्यूयॉर्कमध्ये एकाच वेळी लॉन्च केला जाऊ शकतो. याच स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...


Asus ROG Phone 7 : ROG  मध्ये काय आहे खास?


ROG 7  फोनमध्ये आणखी वेगवान परफॉर्मन्स आणि उत्तम गेमिंगचा अनुभव मिळेल. Asus ने यात कोणते बदल केले जाऊ शकतात हे उघड केले नाही, परंतु हा फोन अलीकडेच काही फीचर्ससह गीकबेंच बेंचमार्किंग वेबसाइटवर दिसला आहे. यातून याचे काही फीचर्सही लीक झाले आहेत. 


Asus ROG Phone 7 : फीचर्स 


मिळालेल्या माहितीनुसार, Asus ROG Phone 7 चे किमान तीन प्रकार लॉन्च केले जाऊ शकतात. Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर फोनच्या मार्की व्हेरिएंटमध्ये आढळू शकतो. याशिवाय डायमेंशन प्रोसेसरसह काही व्हेरिएंट देखील येऊ शकतात. लिस्टिंगवरून असेही समोर आले आहे की, फोनमध्ये 16GB LPDDR5X रॅम आणि UFS 4.0 स्टोरेज दिले जाऊ शकते. हा फोन नवीन Android 13 सह येऊ शकतो.


Asus ROG Phone 7 : फोनची बॅटरी आणि डिस्प्ले


Asus ROG Phone 7 TENAA सर्टिफिकेशन वेबसाइटवर देखील दिसला आहे. जिथे असे दिसून आले आहे की फोन 5850mAh बॅटरीसह येणार आहे. कंपनी याला 6000mAh बॅटरीसह बाजारात आणू शकते. फोन 3C सर्टिफिकेशन वेबसाइटवर देखील दिसला आहे, त्यानुसार ROG फोन 7 मध्ये फुल HD+ रिझोल्यूशन आणि 165Hz रिफ्रेश रेटसह 6.8-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळू शकतो.


OnePlus Nord CE 3 Lite लवकरच होणार लॉन्च 


स्मार्टफोन निर्माता OnePlus पुढील महिन्यात OnePlus Nord CE 3 Lite लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात कंपनीने स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याबद्दल माहिती दिली आहे. अनेक लोक OnePlus Nord CE 3 Lite ची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण ही सीरीज परवडणाऱ्या किमतीच्या रेंजमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.