Ashtavinayak darshan: आता गणेश भक्तांना घरी बसून अष्टविनायक मंदिरांना शुभेच्छा पाठवता येतात. केनस्टारने एक खास मंच तयार केलाय जिथे भक्तांना त्यांच्या प्रार्थना आणि शुभेच्छा ऑनलाईन सादर करता येतील आणि नंतर या शुभेच्छा अष्टविनायक यात्रेशी संबंधित आठही पवित्र मंदिरांमध्ये नेल्या जातील. विशेष म्हणजे या मोहिमेत सहभागी होणाऱ्या गणेश भक्तांना या मंदिरांमधून प्रसादही देण्यात येणार आहे.
अष्टविनायक यात्रेत भाविक गणपती बाप्पाच्या आठ प्राचीन मंदिरांना भेट देतात. यापैकी प्रत्येक मंदिराची अद्वितीय आख्यायिका आणि महत्व आहे. पण दरवेळी या मंदिरांना भेट देणं शक्य होत नाही. त्यामुळे या मोहिमेतून भक्तांना आठही अष्टविनायक मंदिरांना शुभेच्छा पाठवण्यात येणार आहेत.
बाप्पाचा आशिर्वाद थेट पोहोचणार मंदिरात
या मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक भक्तापर्यंत गणेशाचे आशीर्वाद पोहोचतील याची खात्री करून मंदिरांना शुभेच्छा देण्यासोबतच प्रसादही मिळणार आहे. केनस्टार या घरगुती उपकरणं तयार करणाऱ्या कंपनीनं हा उपक्रम सुरु केला आहे. गणपती भक्तांसाठी हा अध्यात्मिक प्रवास सुलभ करण्यासाठी हा उपक्रम सुरु केल्याचं या संस्थेचे सीईओ सुनील जैन सांगतात. अष्टविनायक यात्रेचे भाविकाांच्या हृदयात खूप महत्त्व आहे.आणि
यातून, पवित्र स्थळाांपासून कितीही अंतरावर ते असले तरी त्यांना परमात्म्याच्या जवळआणण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.
कसं घेणार अष्टविनायकाचं दर्शन
केनस्टारच्या या उपक्रमाला मराठी लोकांकडून याआधीच सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सर्वांना प्रवास करणं शक्य नसलेल्या या काळात अष्टविनायकाचं दर्शन घरबसल्या भाविकांना मिळणार आहे. केनस्टारने एक खास मंच यासाठी (https://bit.ly/3XvDUcE ) तयार केला आहे. जिथे प्रार्थना आणि शुभेच्छा ऑनलाईन सादर करता येतील.