AI will likely replace these jobs first : Artificial intelligence (AI) ची क्षमता आपल्या सर्वांनाच माहित झाली आहे. एआय टूल्स मानव सध्या करत असलेली जवळपास सर्व कामे करू शकतात. एआय टूल जितके चांगले प्रगत असेल तितके अधिक अचूक आणि चांगले परिणाम आपल्या सर्वांना मिळतील. गेल्या वर्षी चॅट जीपीटी (Chat GPT) बाजारात दाखल झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एआयमुळे नोकऱ्या जाणार का? त्याचा बाजारावर काय परिणाम होईल? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर स्वत: ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन (Sam Altman) म्हणाले की, एआयमुळे अनेक लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील तसेच अनेक नवीन संधीही निर्माण होतील. दरम्यान, एक नवीन अभ्यास समोर आला आहे ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, AI मुळे पुरुषांपेक्षा महिलांची नोकरी अधिक धोक्यात आहे.
पुरुषांपेक्षा महिलांना जास्त धोका
मॅकिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूटने 'जनरेटिव्ह एआय अँड द फ्युचर ऑफ वर्क इन अमेरिका' या नावाने नुकताच एक अभ्यास समोर आला आहे. या अभ्यासात असे सांगण्यात आले की, 2030 पर्यंत AI यूएस जॉब मार्केटवर प्रभाव पाडणार आहे. AI मुळे, डेटा कलेक्शनवर परिणाम होईल. म्हणजेच या क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांच्या नोकऱ्या AI मुळे जातील. अहवालात म्हटले आहे की, 2030 पर्यंत फक्त अमेरिकेत सुमारे 12 मिलियन व्यावसायिक बदल होतील.
एआयमुळे पुरुषांपेक्षा महिला अधिक नोकऱ्या गमावतील, असंही या अहवालात म्हटलं आहे. मॅकिन्सेच्या अहवालात असं म्हटलं आहे की, एआय ऑटोमेशनमुळे, महिलांना पुरुषांपेक्षा नवीन व्यवसायांमध्ये बदलांची आवश्यकता 1.5 पट जास्त असेल. म्हणजे महिलांच्या नोकऱ्या अधिक जातील. यूएस मध्ये, महिला फूड सर्विस, कस्टमर सपोर्ट आणि इतर सार्वजनिक व्यवहारांमध्ये अधिक काम करतात. या क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांपेक्षा श्रेष्ठ मानले जाते. मात्र, एआयमुळे या सगळ्यावर परिणाम होणार असून आगामी काळात एआय टूल्स महिलांचे काम करणार आहेत असं या अभ्यासात म्हटलं आहे.
McKinsey ग्लोबल इन्स्टिट्यूटचा अंदाज आहे की क्लर्क लोकांची मागणी 1.6 मिलियन नोकऱ्यांनी कमी होऊ शकते, त्या व्यतिरिक्त किरकोळ विक्री करणार्यांसाठी 830,000, प्रशासकीय सहाय्यकांसाठी 710,000 आणि कॅशियरसाठी 630,000 नोकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. अभ्यासात असे म्हटले आहे की, या नोकऱ्यांमध्ये पुनरावृत्ती होणारी कार्ये, डेटा कलेक्शन आणि प्रायमरी डेटा कलेक्शनचे मोठे प्रमाण आहे जे AI कमी खर्चात सहज करू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :