Apple Smartwaches Baned In US : अॅपलला अमेरिकेच्या कोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. यावर्षी लाँच झालेल्या Watch 2 Ultra आणि Watch 9 Series च्या विक्रीवर (Apple Watches) अमेरिकेच्या कोर्टाने बंदी घातली आहे. इंटरनॅशनल ट्रेड कमिशनच्या याचिकेवर कोर्टाने वॉच सीरिज 9 आणि वॉच अल्ट्रा 2 च्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. मात्र, अॅपलने आपल्या लेटेस्ट स्मार्टवॉचवरील बंदीविरोधात याचिका दाखल केली आहे. या बंदीला किमान दोन आठवडे स्थगिती द्यावी, अशी विनंती कंपनीने न्यायालयाकडे केली आहे. अॅपलने या स्मार्टवॉचच्या रिडिझाइन केलेल्या मॉडेलवर निर्णय घेण्यासाठी कोर्टाला वेळ मागितला आहे.
युएसआयटीसीच्या (यूएस इंटरनॅशनल ट्रेड कमिशन) निर्णयाशी कंपनी सहमत नसल्याचे सांगत अॅपलने या बंदीविरोधात याचिका दाखल केली आहे. आतापर्यंत विकल्या गेलेल्या सर्व apple Watch 2 Ultra आणि Watch 9 Seriesच्या परताव्यासंदर्भात कंपनी आवश्यक ती सर्व पावलं उचलत आहे. लवकरच अमेरिकेच्या बाजारात विकली जाणारी हे सगळे गॅजेट्स परत मागवण्यात येणार आहेत.
बॅन करण्याचं नेमकं कारण काय?
या वर्षी लॉंच झालेल्या या दोन्ही स्मार्टवॉचला चांगलीच पसंती मिळाली आहे. या दोन्ही स्मार्टवॉचमध्ये वापरण्यात आलेल्या ब्लड-ऑक्सीजन सॅचुरेशन टेक्नोलॉजीला अंतर्राष्ट्रीय ट्रेड कमीशन ने टेक फर्म Masimo च्या पेटंटचं उल्लंघन केलं आहे. या Masimo ने ब्लड-ऑक्सीजन सेचुरेशन टेक्नोलॉजीचं पेटंट सर्वात आधी मिळवलं होतं. मात्र त्यानंतप अॅपलने ही टेक्नॉलॉजी वापरुन दोन घड्याळ लॉंच केले. ते पसंतीस सुद्धा आले. त्यामुळे हे पेटंट चोरल्यामुळे अॅपलचे हे दोन वॉच बॅन करण्यात आले आहेत.
फिचर्स कोणते आहेत?
Apple Watch Ultra 2 और Apple Watch Series 9 यात ऑलवेज-ऑन-रेटिना डिस्प्ले आहे जो 3,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस सपोर्ट करतो. अॅपलचे हे स्मार्टवॉच आयफोन 15 सीरिजसह यावर्षी लाँच करण्यात आले आहेत. अॅपल वॉच अल्ट्रा 2 आणि वॉच सीरिज 9 मध्ये एस 9 एसआयपी चिप आहे. याशिवाय सिरीवरून ही घड्याळे नियंत्रित करता येतात. यामध्ये डबल टॅप जेस्चर, हार्ट रेट मॉनिटरिंग सिस्टीम, ब्लड-ऑक्सिजन मापन फीचर, लो कार्डिओ फिटनेस नोटिफिकेशन, टेंपरेचर सेन्सिंग यांसारख्या अॅडव्हान्स फीचर्सचा समावेश आहे.
इतर महत्वाची बातमी-
Year Ender 2023 : 2023 मध्ये 'या' पाच फोनची होती क्रेझ; आता किंमत घसरली, लगेच खरेदी करा!