Apple iOS 17.4 Updates : ऍपल (Apple) यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपल्या पात्र iPhone आणि iPad मध्ये iOS 17.4 आणि iPadOS 17.4 रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. Apple च्या या नवीन ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. जसे की, iPhone वर पर्यायी ऍप मार्केटची सुरुवात, बँका आणि पेमेंट प्रोवाडर्ससाठी NFC ऍक्सेस करण्यात आले आहेत.
खरंतर, हे बदल फक्त EU म्हणजेच युरोपियन यूजर्ससाठी लागू करण्यात आले आहेत. Apple ने आपल्या नवीन अपडेटमध्ये युरोपीयन यूजर्ससाठी काही अतिरिक्त बदल केले आहेत. तर, बाकीचे बदल तसेच नवीन फीचर्स हे आयफोनच्या सर्व यूजर्ससाठी करण्यात आले आहेत.
Apple डिव्हाईसमध्ये नवीन इमोजीचा समावेश
नवीनतम अपडेटसह, Apple ने नवीन मशरूम, लिंबू, फिनिक्स, तुटलेली साखळी आणि शेकिंग हँड इमोजी आपल्या सॉफ्टवेअरमध्ये जोडले आहेत. ज्याचा वापर iPhone किंवा iPad यूजर्सना आपला फोन अपडेट केल्यानंतर वापरू शकतात. याशिवाय, नवीन अपडेटनंतर, आयफोन 15 सीरिज यूजर्स बॅटरी सायकल काऊंट, मॅन्युफॅक्चर डेट आणि बॅटरी हेल्थ सेक्शनमध्ये अनेक नवीन फीचर्सचा वापर करू शकतील.
स्टोल डिव्हाईस प्रोटेक्शन
याशिवाय Apple ने स्टोल डिव्हाईस प्रोटेक्शन अंतर्गत एक नवीन पर्याय जोडला आहे. हे नवीन फीचर सर्व ठिकाणी डिव्हाईसची सुरक्षा वाढविण्याचे काम करतात. जर तुमचे डिव्हाईस चोरीला गेले आणि नवीन ठिकाणी वापरले असल्यास, स्टोलन डिव्हाईस प्रोटेक्शनचं हे नवीन फीचर कोणतीही माहिती जसे की, अॅपल आयडी, पासवर्ड यांसारखी महत्त्वाची माहिती बदलण्यापासून किंवा त्याचा एक्सेस करण्यापासून प्रतिबंधित करेल.
नवीन अपडेटमध्ये मिळणार ट्रान्सक्रिप्ट फीचर
या नवीन अपडेटमध्ये एक नवीन ट्रान्सक्रिप्शन फीचर देखील जोडण्यात आलं आहे. हे फीचर यूजर्सना इंग्लिश, जर्मन, फ्रेंच आणि स्पॅनिश भाषेत ऑडिओसह सिंक केलेल्या टेक्स्टसह पॉडकास्ट ऐकण्याची संधी देते. या मजकूराच्या भागात तुम्ही टेक्स्टला पूर्णपणे वाचू शकता. कोणत्याही एका शब्द किंवा वाक्य शोधता येते.तसेच, विशिष्ट ठिकाणाहून पॉडकास्ट प्ले करण्यासाठी टेक्स्टला टॅप केला जाऊ शकतो.
याशिवाय यूजर्स टेक्स्ट साईज वाढवणे, कॉन्ट्रास्ट आणि व्हॉईस ओव्हर यांसारख्या वैशिष्ट्यांचाही लाभ घेऊ शकतात. याशिवाय ॲपल असिस्टंट सिरीमध्ये अनेक नवीन क्षमतांचा समावेश करण्यात आला आहे. आता सिरी कोणत्याही समर्थित भाषेत इनकमिंग कॉल्सची घोषणा करू शकते.
काही नवीन फीचर्स जोडण्याव्यतिरिक्त, Apple ने आपल्या नवीन अपडेट्ससह काही जुने फीचर्स देखील अपडेट केले आहेत. याशिवाय काही खास फीचर्स आहेत जे फक्त युरोपियन यूजर्ससाठी सादर करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :