Apple : फेमस Apple कंपनीने जून तिमाहीत विक्रमी कमाई केलेली आहे. अॅपलचे सीईओ (CEO) टिम कुक म्हणाले की, "जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये कंपनीने केलेल्या कामगिरीबद्दल ते खूश आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, "भारतीय बाजारपेठांची क्षमता पाहता Apple ची विक्री मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे."
Apple ने आत्तापर्यंत केलेल्या कमाईच्या अहवालात भारतीय बाजापेठांनी मोठी कामगिरी बजावली आहे. कंपनीने सांगितले की, "भारतात सुरू केलेल्या Apple स्टोअरची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे." भारतीय बाजारपेठांच्या क्षमतेद्दल टिम कुकला विचारले असता त्यांनी सांगितले की, "आम्ही जून तिमाहीत भारतात विक्रमी कमाई केली. आम्ही या तिमाहीत आमची पहिले दोन रिटेल स्टोअर्स देखील चालू केले आणि हे रिटेल स्टोअर (Retail Store) आता आमच्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत आहेत."
कंपनीने सांगितले की, "Iphone खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आम्ही गुंतवणूक करत राहू आणि ग्राहकांना अनेक आॅफर देऊ. भारतीय बाजारपेठ ही जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे स्मार्टफोन मार्केट आहे आणि आम्ही तेथे खरोखर चांगले काम केले पाहिजे आणि आत्तापर्यंत झालेल्या आमच्या कमाईबद्दल आम्ही खूश आहोत. तर कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, या स्मार्टफोन मार्केटमध्ये त्यांचा हिस्सा अजूनही खूप कमी आहे, त्यामुळे अॅपलसाठी येथे मोठी संधी आहे.
भारत हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे स्मार्टफोन मार्केट आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने मिड-सेगमेंट स्मार्टफोनचे वर्चस्व आहे. आणि आयफोन खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न आहे. त्यामुळे अॅपलचा बाजारातील हिस्सा वाढत आहे. सायबर मीडिया रिसर्चच्या अहवालानुसार, अॅपलने 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत स्मार्टफोन मार्केटमध्ये 61 टक्के वाढ नोंदवली आहे. मे महिन्यात, आयफोनच्या निर्यातीने विक्रमी रु. 10,000 कोटींचा टप्पा गाठला होता, ज्यामुळे त्या महिन्यात देशातून एकूण मोबाईल शिपमेंट रु. 12,000 कोटी झाली होती. भारतात अॅपलची वाढ चांगली होत असल्याचे उद्योग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सायबरमीडिया रिसर्चचा अंदाज आहे की या वर्षाच्या अखेरीस स्मार्टफोन मार्केटमध्ये Apple चा वाटा 7% च्या जवळपास असेल. तर अॅपलने आयफोनची जोरदार विक्री केलेल्या इतर बाजारपेठांमध्ये इंडोनेशिया, पोलंड, फिलीपिन्स, तुर्की, यूएई, मेक्सिको आणि सौदी अरेबिया यांचा देखील समावेश आहे
इतर महत्वाच्या बातम्या