मुंबई : अ‍ॅपल (Apple) कंपनी लवकरच आयफोन 15 सीरिज (iPhone 15 Series Launch) लाँच करणार आहे. आयफोन 15 सीरिज लाँच होण्यास फक्त काही दिवस बाकी आहेत. अ‍ॅपल इव्हेंट (Apple Event) 12 सप्टेंबर 2023 रोजी पार पडणार आहे. यावेळी अ‍ॅपलची नवीन ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे iOS 17 असलेली आयफोन 15 सीरिज लाँच करण्यात येईल. सध्या, अ‍ॅपलच्या बीटा व्हर्जनच्या वेगवेगळ्या टप्प्याची चाचणी सुरु असून बीटाची आठवी आणि अंतिम आवृत्ती म्हणजेच बीटा व्हर्जन 8 लाँच करण्यात आलं आहे. बीटा व्हर्जन 8 चाचणीनंतर नवीन iPhone 15 मॉडेल्समध्ये समाविष्य केलं जाईल.


iOS 17 बीटा व्हर्जन 8 कसं आहे?


मार्क गुरमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅपलने iOS 17, iPadOS 17 आणि WatchOS 10 चं बीटा व्हर्जन 8 जारी केलं आहे. iPhone 15 सीरिजच्या अधिकृत लाँचपूर्वी ही शेवटची आणि अंतिम चाचणी आवृत्ती आहे. गुरमन यांनी सांगितलं की म्हणाले, "कंपनीने असेंब्ली लाईनवर येणार्‍या आयफोन 15 मॉडेल्सवर बीटा व्हर्जन 8 समाविष्ट करणं सुरू करण्यासाठी सॉफ्टवेअर वेळेत पूर्ण करणं आवश्यक आहे."


आयफोनच्या नवीन iPhone 15 सीरिजची उत्सुकता


अ‍ॅपल सपोर्ट रिपोर्टनुसार, iOS 17 बीटा 8 व्हर्जनमध्ये जुन्या व्हर्जनमधील विविध समस्यांचे दूर करुन नवीन अपडेट देण्यात आली आहे. i डिव्हाइस सुरळीतपणे चालवण्यासाठी बीटा 8 व्हर्जनमध्ये नवीन फिचर्स जोडण्यात आले आहेत. यामध्ये एअरड्रॉप, एअरप्ले, एअरपॉड्स आणि इतरही विविध अनेक फिचर्सचा समावेश आहे. एअरपॉड्ससाठी अनुकूल ऑडिओ, वैयक्तिक आवाज आणि संभाषण यासारख्या नवीन फिचर्ससह ही सीरिज असणार आहे. 


अ‍ॅपल इव्हेंटची उत्सुकता


अॅपल दरवर्षी या इव्हेंटमध्य् आपल्या नवीन जनरेशनचे आयफोन लाँच करत असल्यामुळे हा इव्हेंट वर्षातील सर्वात-प्रतीक्षित टेक इव्हेंट मानला जातो. यावर्षी या इव्हेंटमध्ये Apple Watch 9 आणि Apple Watch Ultra 2 सोबत iPhone 15 लाइनअपची घोषणा करण्यात येईल. अॅपल इव्हेंटची यंदाच्या वर्षीची टॅगलाइन "वंडरलस्ट" आहे. हा इव्हेंट 12 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.