iPhone 15 : Apple ने कॅलिफोर्नियातील Apple मुख्यालयाच्या 'स्टीव्ह जॉब्स थिएटर' येथे iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max फोन लॉंच केले आहेत. आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स फोनमध्ये काय खास आहे? तसेच या फोनच्या प्री-ऑर्डर बुकिंगबाबत जाणून घ्या



प्री-ऑर्डर कधीपासून? भारतात कधी उपलब्ध होणार?
या दोन्ही Apple फोनच्या प्री-ऑर्डर 15 सप्टेंबरपासून सुरू होतील, परंतु भारतात, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max 22 सप्टेंबरपासून उपलब्ध होतील. तुम्ही मुंबई किंवा दिल्लीचे असाल तर अ‍ॅपल स्टोअरला जाऊन हे फोन बुक करू शकता. इतर शहरातील लोक Apple च्या अधिकृत साइटला भेट देऊन iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max फोन बुक करू शकतात. आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स फोनमध्ये काय खास आहे ते जाणून घेऊया.



iPhone 15 pro आणि iPhone 15 Pro Max ची किंमत
Apple ने iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max ची किंमत iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max च्या बरोबरीने ठेवली आहे. Apple ने iPhone 15 Pro चा 128 GB स्टोरेज प्रकार $999 मध्ये लॉन्च केला आहे. तर iPhone 15 Pro Max $1199 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.



iPhone 15 pro आणि iPhone 15 Pro Max चे स्पेसिफिकेशन
जिथे iPhone 15 Pro मध्ये 6.1 इंच HDR डिस्प्ले मिळेल. तर iPhone 15 Pro Max मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले असेल. या दोन्ही अॅपल फोनमध्ये डायनॅमिक आयलंड फीचर उपलब्ध असेल. तसेच, iPhone 15 pro आणि iPhone 15 Pro Max चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या बॅटरी 100 टक्के रिसायकल मटेरियलपासून बनवल्या गेल्या आहेत. याशिवाय Apple ने iPhone 15 pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये नवीन A17 Pro चिपसेट दिला आहे, जो गेमिंग अनुभवाला एक पाऊल पुढे नेतो. असा दावा केला जात आहे की, Apple चा नवीन A17 Pro चिपसेट जगातील सर्वात वेगवान चिपसेट आहे. तसेच, iPhone 15 pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये 6 core GPU आणि हैंडल कॉम्प्लेक्स अ‍ॅप्लिकेशन्स आणि रे ट्रॅकिंग फीचर्स देण्यात आले आहे.



iPhone 15 pro आणि iPhone 15 Pro Max फीचर्स
Apple चा iPhone 15 Pro आणि Pro Max टायटॅनियम डिझाइनसह लॉंच करण्यात आला आहे. यात कस्टमाइज अॅक्शन बटण आणि नेक्स्ट जनरेशन पोर्ट्रेटची सुविधा असेल. आयफोन 15 प्रो आणि प्रो मॅक्स ब्लॅक टायटॅनियम, ब्लू टायटॅनियम, व्हाइट टायटॅनियम आणि नॅचरल टायटॅनियम अशा चार रंगांमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. यावेळी नवीन iPhone 15 सिरीजमध्ये यूजर्सना चार्जिंगसाठी USB Type-C पोर्टचा सपोर्ट मिळेल. म्हणजेच लाइटनिंग पोर्ट फोनमधून काढून टाकण्यात आले आहे. हा पोर्ट आता बहुतेक नवीन Androids मध्ये आढळतो.


 


iPhone 15 Pro आणि Pro Max चा कॅमेरा
iPhone 15 Pro आणि Pro Max च्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांच्या मागील पॅनलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 48MP मुख्य पोर्ट्रेट कॅमेरा उपलब्ध असेल, जो रात्रीच्या मोडमध्ये उत्कृष्ट फोटो क्लिक करतो. एक नवीन 24MP फोटोनिक कॅमेरा उपलब्ध असेल, जो कस्टमाइज कॅमेऱ्याचा अनुभव देईल. तसेच, तिसऱ्या कॅमेरामध्ये 5X ऑप्टिकल झूमसह 12MP टेलिफोटो कॅमेरा असेल.


 


संबंधित बातम्या


iPhone 15 Series : बहुप्रतिक्षित आयफोन 15 सीरिज लाँच, भन्नाट फिचर्स आणि किंमत जाणून घ्या...